आणखी एका मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक

91

मुंबई :

नागराज मंजुळेच्‍या ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’नंतर आता हिंदी निर्माता- दिग्दर्शक मराठी चित्रपटांकडे वळले आहेत. २०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मला आई व्हायचंय’ चित्रपटाचाही हिंदी रिमेक लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान हे या चित्रपटाचा रिमेक बनवणार आहेत. दिग्दर्शक समृद्धी पोरे यांच्याकडून कायदेशीररित्या हिंदी रिमेकचे हक्क घेतले आहेत.

दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान यांनी ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा जाहीर केली होती. या सिनेमामध्‍ये हिंदीतील आणि हॉलिवूडमधल्या गाजलेल्या नायिका काम करणार आहेत. कथेचे लेखन स्वतः समृद्धी पोरे करणार आहेत. याच चित्रपटाचे तेलुगु रिमेक हक्क त्यांनी या आधीच दिले होते.

एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिगींनतम श्रीनिवास राव यांनी हा चित्रपट बघितला होता आणि त्यांनी निर्मिती समृद्धी पोरे यांना तेलुगु रिमेकसाठी मागणी केली होती. श्रीनिवास राव यांनी ‘पुष्पक’, कमल हसनचा ‘अप्पुराजा’ इत्यादी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!