आरळीत जगप्रसिद्ध कीर्तीचे मकरंद बुआ रामदासी यांची कीर्तनसेवा

106

तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तालुक्यातील आरळी बु येथे दि. 16 मे रोजी सायंकाळी 7 वाजता जगप्रसिद्ध कीर्तीचे कीर्तनकर मकरंद बुआ रामदासी (पुणे)
यांची कीर्तनसेवा तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांचे सादरीकरण होणार असून सर्व भागवत संप्रदायातील रसिक श्रोत्यांना त्यांना ऐकण्याचा दुग्ध शर्करा योग जुळवून आणला आहे.

आरळी बु गावचे सुपुत्र प्रसिद्ध तबला वादक गणेश तानवडे यांचे वडिल कै. विश्वनाथ तानवडे प्रथम पुण्यतिथी निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,आरळीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने होत असते पण भजन, किर्तन सेवेच्या माध्यमातून प्रथमच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत एकत्र येत असून कीर्तनकार मकरंद बुआ रामदासी (पुणे) यांची कीर्तनसेवा व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांचा कार्यक्रम परिसरातील रसिक श्रोत्यांना ऐकावयास मिळणार हा योगच म्हणावा लागेल.

कीर्तन व जलतरंग सेवेनंतर सचिन बोधणे (सलगरा),हरिष कुलकर्णी (लातूर) यांची भजनसंध्या सादर होणार आहे. यात साथसंगत पखवाज गणेश पापळ,तबला गणेश तानवडे यांची असणार आहे.

तरी परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गणेश तानवडे व आरळी बु भजनी मंडळ यांनी केले आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!