आर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून

171

यवतमाळ : सुशील भगत

सावकारीतील व्याजाच्या पैश्याच्या वादातून आर्णी येथील भाजप कार्यकर्ता निलेश हिम्मतराव म्हस्के याचा शुक्रवारी दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोर खून करण्यात आला. हल्यानंतर तिन्हीही आरोपी शस्त्रासह स्वता पोलीस ठाण्यात हजर झाले.

आरोपीमध्ये संजय यशवंत देठे वय 49 वर्षे, मिलिंद संजय देठे वय 21 व गुलाबराव रामराव धकाते 57 सर्व राहणार पहूर नस्करी तालुका आर्णी यांचा समावेश आहे.

पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार दोन वर्षा निलेश चे वडील हिम्मतराव म्हस्के यांनी संजय देठेला दहा टक्के व्याजाने 45 हजार रुपये दिले होते. त्यापोटी शेतीची इसार चिट्ठी करण्यात आली होती. देठेनी संपूर्ण पैशांची मस्के यांना परतफेड केली. मात्र त्यानंतरही निलेश हा व्याजापोटी आणखी पैशाची मागणी करीत होता. त्यासाठी तो गावात येऊन दमदाटी करायचा. तो पैशासाठी देठेच्या मागावर होता. शुक्रवारी देठे हे मुलाच्या कागदपत्रांच्या कामासाठी तलाठी याच्या कडे आर्णी येथे आला होता. यावेळी त्यांचा शेतातील नौकर गुलाबही होता. ते तिघे एकाच बुलेट ने आर्णीत येत असताना निलेश ने ग्रामी रुग्णालय समोर त्यांना गाठले तेथे वाद करून चाकु व रॉड ने त्यांनी देठेवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी निलेश चे साथीदार ओम बुटले व सौरभ गेडाम त्याच्यासोबत होते. या हल्ल्यात त्यांचा शेतनौकर गुलाब जखमी झाला. मात्र निलेश आपल्याला संपवले याची कल्पना देठे पिता पुत्रांना आल्याने त्यांनी व त्यांचा नौकर गुलाब याने निलेशच्या हातातील रॉड व चाकु घेऊन त्याच्यावर हल्ला केला. निलेश च्या बचावासाठी गेलेला ओम बुटले यात जखमी झाला. गंभीर जखमी निलेश ला यवतमाळ येथे हलविले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. हल्ल्यानंतर तिघांनीही चाकु रॉड सह पायदळ आर्णी पोलीस ठाण्यात येऊन ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!