आलूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

66

मुरूम : सतिश तोळणुरे

उमरगा तालुक्यातील आलूर येथे 21 एप्रिल रोजी भारतरत्न भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक आंबेडकर मिरवणुकीसाठी सहभागी झाले होते.

गावातील पंचशील लेझीम संघांनी उत्कृष्ठरित्या भीमराव आंबेडकर यांच्या गाण्यावर नृत्य सादर केले याचा पुरेपूर लाभ सर्व नागरिकांनी घेतले. मिरवणुकीदरम्यान तरुण-तरुणीसोबत वयोवृद्धसुद्धा सहभागी होऊन मिरवणुकीची आकर्षितता वाढविली. जयंती उत्सव समितीने नियोजनबद्ध व शांततेत संपूर्ण गावातून मिरवणूक काढून भीमरावांचे संदेश घरोघरी पोहोचविण्याचे काम केले.

मिरवणूक यशस्वी होण्यासाठी समितीचे अध्यक्ष सखाराम कांबळे, उपाध्यक्ष विकास कांबळे, सचिव कोंडीबा गुरवे, भालचंद्र कांबळे, कोंडीबा शिंदे, रामलिंग गायकवाड, कोंडीबा गायकवाड, सुरेश हावळे, भीमशाहिर शेखर कांबळे पोलीस उपनिरीक्षक सानप बिट हवालदार शिंदे ,घंटे ,आदींनी प्रयत्न केले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!