उंबडाॅबाजार येथील गजानन महाराज मंदिरात रामजन्म उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

13

वाशिम : सुशील भगत

कारंजा तालुक्यातील उंबडाॅबाजार येथील
स्थानिक श्री समर्थ गजाननमहाराज संस्थान मधील राममंदीरात दि. 13 एप्रिल रोजी रामजन्म उत्सवानिमित्य भाविकांनी मोठी गर्दी केली होती .

यावेळी रामजन्म कथेचे सुश्राव्य वाचन ह.भ.प. ओम महाराज ठाकूर यांचे मधुर स्वरात करण्यात आले . कथा श्रवण करण्यासाठी महिला भाविकांची उपस्थित लक्षणीय होती.

दुपारी ठिक बारा वाजता रामजन्म होताच मंदिर परिसर रामनामाच्या गजरा ने दुमदुमला होता . महिला भाविकांनी सुमधूर स्वरात रामजन्म उत्सवानिमित्य पाळणे म्हणून आपला आनंद व्दिगुणीत केला .
महाप्रसादच्या कार्यक्रमाने रामजन्म उत्सवा ची सांगता करण्यात आली .रामजन्म उत्सवानिमित्य अयोध्या नगरी गजानन महाराज मंदिर परिसरात अवतरली होती .

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!