उमरगा पोलीस ठाण्यात पोलिसांची हाणामारी; एक जण गंभीर जखमी

6,976

उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा पोलिस ठाण्यातच तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी एका पोलिसास धारदार शस्त्रानेमारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस अधिक्षक काय कारवाई करतील याकडे लक्ष लागले आहे.

राजुदास सिताराम राठोड असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. यातील पोलिस नाईक राजुदास सिताराम राठोड हे शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हे तपासकामी ठाण्यातच उत्तर बिट मधील खोलीत काम करीत होते. या वेळेस पोलिस ठाण्यातीलच लखन गायकवाड, मयुर बेले, सिद्धू शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यानी धारदार शस्त्राने मारहाण करुन गंभीर जखमी केले. यात पोलिस नाईक राजुदास राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस ठाण्याच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांतच हाणामारी होते, मात्र या बाबत स्थानिक पोलिस अधिकारी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास अथवा बोलण्यास तयार नव्हते, या प्रकरणी शनिवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे विश्वासनीय वृत असून पोलिस अधीक्षक आर राजा घटनेबाबत काय पाऊले उचलणार ? हे पहावे लागेल.

पोलीस ठाण्यातच व पोलिसामध्ये जबर मारहाण झाल्याने शहर व जिल्ह्यात मारहाणीची चांगलीच चर्चा रंगली आहे.या अगोदर या तीघांनी चार पाच वेळेस मारहाण केली नाही पण या वेळेस केवळ रक्कमेच्या उद्देशाने मारहाण केली असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान या अगोदरही या तिघांनी चार पाच वेळेस राठोड मारहाण केली असून पण या वेळेस केवळ रक्कमेच्या उद्देशाने मारहाण केल्याचे समजते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!