ओव्हरलोड वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकवर महसूल विभागाने डकवली कारवाईची नोटीस

60

महसूल अधिकार्‍यांनी नुकतीच ट्रकवर कारवाईची नोटीस डकवली आहे. यामध्ये याबाबतचा खुलासा दोन दिवसात सादर करावा. खुलासा सादर न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7) अन्वये दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये असे म्हटले आहे.

मंगळवेढा : शिवाजी पुजारी

महसूल अधिकार्‍यांनी नुकतीच ट्रकवर कारवाईची नोटीस डकवली आहे. यामध्ये याबाबतचा खुलासा दोन दिवसात सादर करावा. खुलासा सादर न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7) अन्वये दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये असे म्हटले आहे.

भीमा नदीच्या पात्रातून ओव्हरलोड वाळू वाहतूक करणार्‍या ट्रक चालकास मंगळवेढ्याचे तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाईची नोटीस सदर वाहनावर डकवून दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये याचा खुलासा दोन दिवसात सादर करावा अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी नोटीस ट्रक चालक प्रकाश मोहिते यांना बजावली आहे.

या घटनेची हकीकत अशी की, भीमा नदीच्या पात्रातून दिनांक 24 सप्टेंबर रोजी माचणूर ते श्री संत दामाजी कारखाना पाटी या दरम्यान ट्रक क्रमांक एम.एच 04 डी.डी.2326 हा जात असताना महसूल अधिकार्‍यांनी तो ट्रक थांबवून ओव्हरलोड बाबत तपासणी केली. यावेळी चालकाने दाखविलेल्या पावतीपेक्षा ज्यादा वाळू सदर ट्रकमध्ये असल्याचे निर्दशनास आले. महसूल अधिकार्‍यांनी हा ट्रक जप्त करून पोलीस स्टेशन आवारात आणून लावला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!