कणकवलीत अवघ्या सात वर्षाच्या चिमुकलीला आईनेच लावला फास

38

सिंधुदुर्ग : सुरेश कौलगेकर

कणकवली तालुक्यातील भिरवंडे-परतकामवाडी येथे आपल्या माहेरच्या घराकडील मांगराच्या लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीने मयत वैष्णवी विश्वनाथ कदम (३२, रा. पिसेकामते) व चिमुकली गिरजा विश्वनाथ कदम (वय ७) गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना सकाळी मयतीचे वडिल बाहेर गेले असताना १० ते १२ वाजण्याच्या मुदतीत घडली.आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातुन केली? घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनसह पथकाने जावुन पंचनामा केला.सात वर्षीय गिरजाला गळफास लावुन आईनेही आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, मयत वैष्णवीचे भिरंवडे येथे माहेर असुन पिसेकामते येथे सासर आहे. सद्या वैष्णवी आपल्या पतीसमवेत मुंबई येथील भांडुप-प्रतापनगर येथे राहत होती. २० मे रोजी मुलांसमवेत मयत वैष्णवी भिरवंडे येथील माहेरी आली होती. वडिल कामानिमित्त सकाळी कनेडी येथे गेले असताना अचानक मयत वैष्णवीने आपल्या मुलीसमवेत नायलॉनच्या दोरीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घराशेजारील मांगरात गळफास लावुन वैष्णवीने आत्महत्या केली. मांगराचा दरवाजा बंद दिसल्याने वडिल सुहास सावंत यांना संशय आला. त्यांनी पाहीले असता दोघेही नायलॉनच्या दोरीला लटकत होते. ही आत्महत्या का केली? अचानक आत्महत्या करण्यामागे कोणते कारण आहे का? याची प्राथमिक चौकशी केली असता नवरा चांगला सुस्वभावी होता, अशी माहीती पोलीस सुत्रांनी दिली. पोलीस उपनिरिक्षक प्रकाश कदम, जयश्री पाटील यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!