करमाळा येथे रविवारी होणा-या वधुवर परीचय मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

115

काटी:–( प्रतिनिधी ) –

संकेत मंगल कार्यालय कुर्डुवाडी येथे करमाळा येथील नियोजित वधुवर परीचय मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र मराठा सोयरीकचे प्रणेते सुनीलराव जवंजाळ पाटील बुलडाणा, हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सम्पन झाली, बैठकीमध्ये करमाळा येथील मेळाव्याची भूमिका विशद करताना जवंजाळ पाटील म्हणाले की लग्न हा विषय घेऊन तरुण पिढीमध्ये कमालीचे नैराश्य पसरले आहे, काल परवाच एका तरुणाने मुख्यमंत्र्यकडे लग्न जुळत नाही म्हणून इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे, ही बाब समाजाच्या दृष्टीने अत्यंत गम्भीरे आहे, ही काळाची पाऊले आधीच ओळखून महाराष्ट्र मराठा सोयरीकने राज्यात विनाशुल्क मेळावे आयोजित करण्याची शृंखला 2016 पासून सुरू केलेली आहे, एव्हड्यावरच न थांबता राज्यात 290 तालुक्यात फिरून तालुका निहाय ग्रुप तयार करून त्यावर बायोदात्याची आदान प्रदान केली जाते अशी माहिती जवंजाळ पाटलांनी दिली, ज्योतिराम गोरे यांनी समाजात वाढलेल्या विवाह संस्था त्यांचेकडून होणारी लूट यावर चिंता व्यक्त केली, डॉ दास सर यांनी सुद्धा बैठकीला मार्गदर्शन करून मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात समाज बांधवानी घ्यावा असे आव्हान केले, नागनाथ बागल यांनी महाराष्ट्र मराठा सोयरीक ची भूमिका विशद करून अश्या पद्धतीने राज्यात 18 जिल्ह्यात मेळावे घेतल्याची माहिती दिली, बैठकीचे प्रास्ताविक मनोज गोरे यांनी केले,महाराष्ट्र मराठा सोयरिकच्या कार्यबदल माहिती देऊन, कर्मल्याच्या नावलोकीकप्रमाणे कार्यक्रम घडवून आनुयात असे आव्हान उपस्थित समाज बांधवाना केले.

आभार प्रदर्शन करतांना मनोज लोंढे म्हणाले
महाराष्ट्र मराठा सोयरिक एक सामाजिक संघटन,हे एक सोशल मिडियावरील सर्वात मोठे सामाजिक संघटन असून,आज राज्या बाहेरही याचे जाळे पसरले आहे,महाराष्ट्र मराठा सोयरीक ही एक सहज व्हाट्स अपवर सुचलेली कल्पना आहे,परंतु आज ते वास्तवातील सर्वात मोठे सामाजिक संघटन बनले असून अनेक समाज उपयोगी उपक्रम यातून राबवण्यात येत आहेत,या संकल्पनेचे प्रणेते सुनीलराव जवंजाळ पाटील हे एक सर्व सामान्य शेतकरी असून त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पायाखाली पिंजून काढला आहे,महाराष्ट्रातील सर्व क्रांती मोर्चा ला उपस्थित राहून समाजाचे संघटन अधिक मजबूत केले,एवढ्यावरच न थांबता मराठा सोयरीक ग्रुपच्या व समाज बांधवांच्या सहभागातून राज्यस्तरीय वधु- वर परिचय मेळावे सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातही कुर्डुवाडी येथे महाराष्ट्र मराठा सोयरीकचा मोफत वधु-वर परिचय मेळावा 24 मार्च- 2019 ला संपन्न झाला असून त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात समाजाला झालेला आहे
महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपची अधिकृत स्थापना २९ जानेवारी २०१६ रोजी बुलडाण्यात झाली असुन बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल जवंजाळ पाटील हे संस्थापक अध्यक्ष आहेत.
केवळ जिल्हापुरताच मर्यादीत न राहता महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपची व्यापती राज्यभर झाली असून ३६ जिल्ह्यात हा ग्रुप सक्रिय रित्या कार्यरत आहे.

महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुप हा राजकारण विरहीत असून समाजातील सर्व प्रकारचे मान्यवर यात सहभागी आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून विवाहोत्सुक मुला-मुलींच्या बायोडाट्यांची अदान प्रदान मराठा सोयरीक ग्रुपवर केली जाते. त्यामुळे लोकांना सहज घरबसल्या उपलब्धता होते. त्यातून पात्र युवक युवतींचे नातेवाईक अवडलेल्या स्थळासाठी संपर्क करून पुढील प्रक्रिया करुन सोयरीक केली जाते.आतापर्यंत राज्यभर दहा हजारा पेक्षा जास्त विवाह सहज रित्या जूळून आलेआहेत. एवढ्यावरच न थांबता राज्यभर विनाशूल्क वधु वर परिचय मेळावे घेण्यात आले.

अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, सिंदखेडराजा, उस्मानाबाद, मुरुड,परभणी,कुर्डुवाडी येथे मेळावे संपन्न झालेले आहेत.यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता मेळावे यशस्विरित्या पार पाडले आहेत,त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज संघटीत झाला असुन या मेळाव्यात सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा मोफत पुरवल्या जातात हे विशेष.!

अशाच प्रकारचा एक राज्य व्यापी विनाशुल्क मेळावा “ करमाळा ” येथे 2 जून ला सम्पन होतआहे ,त्याचा बहुसंख्य समाज बांधवानी लाभ घेण्याचे आवाहन कुर्डुवाडी मेळावा आयोजन समिती तर्फे करण्यात आले,
बैठीकला, मनोज गोरे, डॉ दास सर, बाळासाहेब जाधव,पंकज पिंगळे कुर्डुवाडी मेळावा नियोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते, त्याचप्रमाणे जलगावरून सुधीर काळवाघे, मुरूडचे वसंत मस्के, औरंगाबादचे, पोपटराव पाटील सपकाळ ,भाऊसाहेब काळे, प्रतिभा जगताप, तर बुलडण्यावरून ,गजानन राव माने, नारायणराव मिसळ, परभणी वरून सुभाषराव जावळे पाटील, उसमनाबद वरून ,समभाजीराव फरताडे, झुंबरलाल भदे, सौ पवार, यादव सर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!