कर्जबाजारीपणाला कंटाळून येडोळा येथे एकाची गळफास घेवून आत्महत्या

243

नळदुर्ग, दि. 10 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 36 वर्षीय इसमाने येडोळा ता. तुळजापूर येथे शनिवार रोजी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली.

दुधाजी नामदेव जाधव (वय 36 वर्षे, रा. येडोळा तांडा, ता. तुळजापूर) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे.

याप्रकरणी घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, दुधाजी जाधव हा कर्जबाजारी झाला होता. त्यास कंटाळून शनिवार रोजी सकाळी मुशीद सावकार यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली व ही घटना दुपारी उघडकीस आली, असे बोलताना माजी सरपंच सुनिल जाधव यांनी सांगितले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!