काजळेश्वर उपाध्ये येथे श्रीरामनवमी उत्सव उत्साहात संपन्न

8

वाशिम : सुशील भगत

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विठठल रुखमिनी संस्थान काजळेश्वर उपाध्ये येथे गावकऱ्यांच्या सहयोगातून संस्थानच्या पुढाकारातून श्रीरामनवमीचा उत्सव उत्साहात संपन्न झाला.

गुढीपाडव्यापासून मंदीरात अंखंड रामनाम सप्ताह सुरु होता. श्रीरामनवमीला सकाळी हरिनाम सप्ताहाची सांगता श्री विठ्ठल रुखमीनी संस्थानचे अध्यक्ष अंबादास पाटील उपाध्ये यांचे हस्ते झाली _त्यानंतर काल्याचे व श्रीराम जन्माचे हरी कीर्तन स्वामी भारतानंद गिरी यांचे अनुयायी यांनी मधूर वाणीतून केली . ह.भ.प. विश्वनाथ महाराज तीडके यांनी श्रीरामाचा पाळना गाईला . भावीक महिलांनी देवाला झोका दिला . सर्वाना काला वाटण्यात आला . राजे गृप महिला वर्ग गावकरी संस्थानचे पदाधिकारी यांचे पुढाकारातून गावकऱ्यांना संध्याकाळी महाप्रसाद महापंगतीद्वारा देण्यात आला . हं भप ‘गोपाल महाराज तथा स्वामीजींचे अनुयायी यांनी श्रीराम जन्मोत्सव कार्यात सहभाग दिला . राजे गृपचे सदस्यांनी स्वयंस्फूतीने धार्मीक कार्य तडीस नेले .

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!