कुर्डूवाडी येथे रविवारी महाराष्ट्र मराठा सोयरिक राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

102

कुर्डुवाडी, दि. 19 : महाराष्ट्र मराठा सोयरिक राज्यस्तरीय विनाशुल्क वधू वर व पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मार्च 2019 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या दरम्यान संकेत मंगल कार्यालय बायपास रोड कुर्डूवाडी येथे महाराष्ट्र मराठा सोयरीक या संकल्पनेचे संकल्पक सुनीलराव जवंजाळ पाटील बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा मराठा सोयरीकचे जिल्हा समन्वयक संजय टोणपे यांनी दिली. सदर मेळावा हा जिजाऊंच्या लेकींच्या पुढाकारातून व सोलापूर जिल्हा मराठा सोयरीकच्या वतीने संपन्न होत आहे.

आगमन झाल्यानंतर सकाळी आठ ते 10 या वेळेत उपस्थित वधू-वर उमेदवारांनी नोंदणी कक्षामध्ये आपला फोटो व बायोडाटा जमा केल्यानंतर सकाळी दहा वाजता नोंदणी केलेल्या पहिल्या 5 वधू उमेदवारांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात येणार आहे यानंतर उपस्थित जिजाऊंच्या लेकींचे मनोगत व नंतर उपस्थित वधू-वर उमेदवारांना मार्गदर्शन पर विवेचन करण्यात येणार आहे.

सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान होणाऱ्या परिचय सत्रामध्ये उपस्थित प्रत्येक उमेदवाराने आपला परिचय व्यासपीठावर जाऊन केल्यानंतर उमेदवारांच्या व पालकांच्या सोयीनुसार भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्णपणे मोफत असलेल्या या मेळाव्याला राज्यातील मराठा समाजबांधवांनी व वधू वर उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी ज्योतीराव गोरे, डॉ.राजेंद्र दास ,नागेश लोंढे, मनोज गोरे, रावसाहेब पाटील, महादेव फासे, उल्हास पाटील, विजय चव्हाण, सतीश कन्हेरे,वामनराव टोणपे,नागेश बागल, पंकज पिंगळे, तानाजी काटे, विजय कन्हेरे, दिलीप उकरंडे, संजय चव्हाण ,अजित पवार, महादेव बागल संजय चव्हाण, कैलास गोरे ,संजय गोरे, सचीन बागल, वसंत शीलारे, रावसाहेब पाटील ,सुरेश भोरे, वसंत मस्के, तानाजी काटे, बाबाराजे बागल ,संतोष बागल यांच्यासह शहर व परिसरातील उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!