खंडाळा येथील मानाच्या महादेव कावडीचे श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तीमय वातावरणात आगमन

132

तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथील शिव कालीन परंपंरा असलेल्या मानाच्या महादेव कावडीचे दि.२२ सोमवारी श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरात भक्तीमय वातावरणात आगमन झाले.

जवळपास ३५० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या तुळजापुर तालुक्यातील खंडाळा येथील मानाच्या महादेव कावडी चे शिखर शिंगणापुर हुन २२५ कि.मी. चा पायी प्रवास करुन परतीच्या मार्गावर असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरात सोमवारी भक्तीमय वातावरणात आगमन झाले.

या मानाच्या कावडी शंभु महादेवाच्या दर्शना करिता जाताना प्रथम श्री तुळजा भवानी मातेचे दर्शन घेऊन व रुढी पंरपंरेने नुसार श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानकडून श्री शंभु महादेव करीता आहेर म्हणून मानाचा फेटा शाल धोतर आणि खन नारळ ओटी असा आहेर देण्यात येतो तसेच याच रुढी पंरपंरेनुसार शंभु महादेव संस्थानकडुन श्री तुळजा भवानी मातेस आहेर म्हणून दवणा गोळी,व विभुती देण्यात येते तोच आणलेला आहेर दवणा गोळी श्री तुळजा भवानी मातेच्या शिरपेचा मध्ये लावण्यात आली.

शेकडो वर्षाची परंपरा खंडाळा ग्रामस्थाच्या वतीने अखंड पणे चालु आहे पुर्वी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक कै राजाभाऊ दिक्षीत यांच्या नंतर या पंरपंरेला खंड पडला होता या वेळेस सुद्धा श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानकडुन टाळा टाळ करण्यात आली होती पण पुर्वीच्या ज्या कांही परंपंरा आहेत.

आजतागायत खंडाळा ग्रामस्थाच्या वतीने जपण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी शिखर शिंगणापुर येथुन आणलेला मानाचा आहेर श्री तुळजा भवानी मातेचे मुख्यमहंत हमरोजी बुवा श्री तुळजा भवानी मातेचे पुजारी शशीकांत पाटील धनजंय पाटील संजय सोंजी युवराज साठे आदीसह पुजारी वर्गानी शंभु महादेव यांचा मानाचा आहेर स्विकारला.या महादेव कावडी च्या वतीने माणिकराव पवार अशोक पवार रमेश पवार राम जाधव हरी पवार श्रीमंत पवार पियुष काकडे आनिल पवार महादेव मोरे बिभीशन लोखंडे किशोर पवार आदीसह भक्तगन उपस्थिती होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!