खरीप हंगामाच्या नियोजनात बळीराजा मग्न;

14

अंबाजोगाई : दत्ता खोगरे

बांधावरच सुर्याेदय अन सुर्यास्त पाहणा-या बळीराजापुढे अनेक प्रश्न उभा असल्याने येणा-या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने अार्थिक गणित जमेल या कडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करण्यात बळीराजा मग्न झालेला दिसत आहे.

अवघ्या काही दिवसावरच पाऊस बरसणार अशी खुशखबर आयएमडीने दिली आहे यामुळे बळीराजा शेतीचे कामे उरकण्यात मग्न झाला आहे अल निनोचा प्रभाव कमी झाला असुन पाऊस लवकरच हजेरी लावणार आहे अशी महिती भारतीय हवामान विभाने दिली आहे मृग नक्षञाकडे लक्ष लागून असल्याने बियाण्यांची निवड, बियाणे चांगले कि बोगस,मिळणारा भाव याचा आंदाज बाधीत तूर,सोयाबीन, ही दोन मुख्यपिके खरीपात घेतले जातात मागील हंगामाचा विचार पूर्वपेरणी अगोदर केला जात आहे या वर्षीही तूर व सोयाबीन पेरणी सर्वाधिक होण्याची शक्यता आहे .खरीप हंगामा अवघ्या काही दिवसावर अला असताना दुष्काळाशी सामना सुरूच आहे भीषण पाणी टंचाई व वेळेवर पाऊस आला नाहीतर नियोजन कोलमडेल का, अशी शंकाही बळीराज व्यक्त करीत आहे बियाणे रासायनिक खते यांची जुळवाजूळव करण्या बरोबरच पैसाची तरतूद करण्यासाठी धडपड सुरू आहे दुष्काळी अनुदान, व सोयाबीनचा पिक विमा मिळेल या अशावर नियोजनावर अार्थिक गणित बांधले जात आहे शेतीचे कामे ट्रँक्टर च्या साह्याने करून घेण्याकड कल आहे एेकरी पंधराशे ते सोहळाशे रूपये भाव सुरू आहे वाढती महागाई पाहाता बैलाच्या साह्याने करून घेण्यासाठी चा-याचा प्रशन व पाणी ह्यामुळे ट्रँक्टरच्या साह्याने शेतीची कामे करून घेण्याकडे कल वाढला आहे पण शेतीची कामे केल्याशिवाय पर्याय नाही गेल्या वर्षिच्या सोयाबीनला 3700 रूपये भाव मिळाला आहे त्यातच काढणीचा खर्च व उत्पादन खर्चाचा मेळ लागत नसल्याने सातत्याने कर्जाचा डोगर वाढत आहे त्यातच मुलांचे शिक्षण, आरोग्य, व वार्षिक खर्चा जुळत नसल्याने येणा-या हंगामात कोणते पिक घ्यावे हे पावसाच्या अंदाजावरच अवलंबून राहणार आहे.

शेतक-यांचा जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यावसाय करतो पण दूधाला भाव नाही पण पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत तर वाळल्या चा-यामुळे हिरावा चाराही नाही त्यामुळे दूध कमी मिळते त्यात भाव नाही यामुळे बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करतांना दिसत आहे.

शेतात खत आणि बाजारात पत या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांचे चांगले आहे असे म्हणतोत पण रासायनिक खतांच्य वाढत्या किमंतीने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!