गणेशमुर्ती साकारण्यासाठी कुंभार कुटुंबीयांंची तिसरीपिढी सक्रिय

184

सावरगाव :दि.२२,दादासाहेब काडगावकर

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन दशकांपूर्वी कै विजय कुंभार यांनी घरातच गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली होती, त्या काळात दर्जेदार गणेशमूर्त्या साकारत कुंभार यांनी लौकीकता मिळवली. गणेशमूर्ती बनवण्यासाठी त्यांची दोन्ही मुले गणेश आणि उमेश अभ्यास करीता वडिलांना मदत म्हणून आणि स्वतःची आवड म्हणून त्यांनी गणेशमूर्ती साकारायला मदत करायचे पण ती मदत त्यांना आता वडिलांच्या पश्‍चात व्यवसाय बनली आहे.

वडिलांच्या निधनानंतर दोघेही भाऊ आपल्या पित्याचा वारसा उत्तमरीतीने सांभाळत आहेत, कुंभार परिवारात पारंपरिक गणेशमूर्ती बनविण्याचा कारखाना आहे.

कै विजय कुंभार यांनी आपल्या पत्नीच्या साथीने या व्यवसायाची जोपासना केली होती. परंतु काही वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. गणेश आणि उमेश हे दोघेही त्यांचे चिरंजीव, शिक्षण करतानाच केवळ स्वतःची आवड म्हणून , वडिलांना थोडीफार मदत म्हणून हे दोघेही मूर्ती बनवायला मदतीचे काम करत, अनेक वर्षानंतर त्या दोघांनाही उत्तम मूर्ती घडवायला यायला लागलीच, शिवाय रंगकामातील बारकावे पाहून मूर्ती रंगवण्याच्या कामातही त्यांनी लक्ष घातले .आकर्षक मूर्ती घडवू लागले.

कुंभार कुटुंबीयांकडे असलेली ही कला पुढे जाणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु दोन्ही बंधूंनी आपल्या हा पारंपरिक व्यवसाय दर्जेदार गणेश मूर्त्या बनवत नावारूपाला आणला आहे. उस्मानाबाद , सोलापुर , लातुर जिल्ह्यातून गणेशमूर्तीला मागणी आहे.

गणेश हा विवाहित आहे त्यांची पत्नीही या कामी हातभार लावते तर उमेश हा सोलापूर येथे शिक्षण घेत आहे .या दोनही बंधूंनी वडिलांचा हा वारसा बंद न करता तो आपणच सांभाळायचा असा निर्धार या केला. ३० वर्षे वडिलांनी केलेली गणेशाची सेवा आपणही यापुढे करायची, असा निर्णय घेऊन गेले पाच वर्षे हे दोघेही वडिलांचा हा पारंपारिक व्यवसाय सांभाळत आहेत.

आजघडीला त्यांच्या कारखान्या, २ फूट ते ८ फुटा पर्यंतच्या ४०० च्या आसपास गणेशमूर्तीं साकारल्या आहेत.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!