गतिरोधकावरून उसळल्याने अॅपेला अपघात; 7 जण जखमी, 3 गंभीर

6

वाशिम : सुशील भगत

मनभ्याकडून सोमठाण्याकडे जाणा-या हातोला ता. दारव्हा येथील अॅपेला उंबडाॅबाजार बसस्थानकानजीक असलेले गतिरोधक दिसले नसल्याने गतिरोधकावरून अॅपे उसळून पलटी झाल्याची घटना दि. 12 एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात 7 जण जखमी होवून तीन जखमींना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.

सविस्तर असे की, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगांव निपाणी येथून दारव्हा तालुक्यातील हातोला येथे परत जाणा-या हातोला येथील अॅपे क्र. एम . एच. 29 टी. 7375 ला उंबडाॅबाजार बसस्थानकानजीक असलेले गतिरोधक दिसले नसल्याने गतिरोधक वरून उसळून अॅपे पलटी होवून अपघात झाला. बसस्थानकावरील नागरिकांनी तातडीने धाव घेवून अॅपे सरळ करून जखमीना उंबडाॅबाजार आरोग्य वरधिनी केन्द्रात दाखल केले.

या अपघातात पिलखेडा ता. कारंजा येथील कु. काजल प्रल्हाद भगत ; सौ. प्रयाग प्रल्हाद भगत यांचे सह दारव्हा तालुक्यातील हातोला येथील प्रभाकर गाडेकर ; संजीव गाडेकर ; प्रमिला गाडेकर ; कुसुम गाडेकर तथा गुलाब शेळके जख्मी झाले.

जखमी वर उंबडाॅबाजार आरोग्य वरधिनी केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. भाऊसाहेब लहाने यांनी प्राथमिक उपचार करून कु. काजल प्रल्हाद भगत व सौ. प्रयाग प्रल्हाद भगत यांना अमरावती येथे तर संजीव गाडेकर व सौ.प्रमिला गाडेकर यांना पुढील उपचारासाठी कारंजा येथे पाठविण्यात आले . उर्वरीत जखमीवर प्रथमोपचार करून सुट्टी देण्यात आली.

उंबडाॅबाजार आरोग्यवधिनी केन्द्राची रूग्णवाहीका एक महिन्यापासून दुरूस्ती साठी उंबडाॅबाजार आरोग्यवरधिनी केन्द्राची रूग्णवाहीका गेल्या एक महिन्यास पासून दुरूस्तीसाठी गेली असून अध्याप ही दुरूस्त झाली नसल्याने ग्रामस्थांना खाजगी वाहनातून रूग्णाना पुढील उपचारासाठी न्यावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!