गळोरगी येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन

31

अक्कलकोट : धोंडाप्पा नंदे

अक्कलकोट तालुक्यातील मौजे गळोरगी येथे श्री बिरलिंगेश्वर यात्रा महोत्सव निमित्त श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच गळोरगी ,समस्त गळोरगी ग्रामस्थ आणि यशोधरा सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच श्री सिध्देश्वर ब्लड बॅंक यांच्याकडून रक्तदान शिबिर ठेवण्यात आले आहे.रक्तदाना नंतर प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि युवा मंच मार्फत आकर्षक भेट वस्तू दिली जाईल.

सदर शिबिराचे आयोजन श्री रेवणसिध्देश्वर मंगल कार्यालय येथे दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.शिबिराचे दीपप्रज्वलन आणि उदघाटन गावातील आणि तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये हदय तपासणी(E C G) ,रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी,रक्तदाब,मधुमेह तपासणी आणि संपुर्ण शरीराची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये 18 ते 60 वयोगटातील सर्व पुरूष आणि महिला सहभाग नोंदवू शकतात.सर्व लाभार्थी यांना तात्काळ तपासणी रिपोर्ट देण्यात येईल.सर्व उपस्थितांकरीता अल्पोपहाराची सोय श्री बिरलिंगेश्वर यात्रा पंचकमिटी यांच्या वतीने करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आणि गावपातळीवरील या शिबिरामुळे सर्व ग्रामस्थांचा अमुल्य वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.शिबिरानंतर नामांकित डाॅक्टरांकडुन सर्व उपस्थितांना आरोग्य आणि आहारांविपयी योग्य मार्गदर्शन लाभणार आहे.

तरी अक्कलकोट तालुक्यातील उडगी,बासलेगाव,जकापुर,कंटोळी,ईटगी आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष श्री सिध्देश्वर शरणप्पा बिराजदार आणि यशोधरा हाॅस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री हनुमंत मेडशिंगे यांच्या कडुन सांगण्यात आले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!