गो-मातेचे पूजन करून वाढदिवस साजरा

8

नळदुर्ग, दि. १५ : नळदुर्ग येथील काँग्रेसचे नगरसेवक व पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता विनायक अहंकारी यांनी वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रामतीर्थ, नळदुर्ग येथे सुरू असलेला गोवंश चारा छावणीमध्ये गो-मातेचे पूजन करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

यावेळी अहंकारी म्हणाले की, भारतीय गोवंशाच्या नष्ट होत चाललेल्या व नागरिकांचे या गाईबद्दल असलेली अनास्था याचे लक्ष वेधण्यासाठी या गोमातेच्या सहवासात आपला वाढदिवस साजरा केल्याचे समाधान आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी रामतीर्थ देवस्थान चे पदाधिकारी श्री बलभीम मुळे यांच्या हस्ते भारतीय पद्धतीप्रमाणे अहंकारी यांचे औक्षण केले. यावेळी नगरसेवक बसवराज धरणे,अमर नागमोडे,प्रभाकर घोडके,जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह श्री हरीष मगदुम
शालीवान वाघमोडे, पिंटू पुदाले, नरेंद्र यादगिरे,राज एकंडे,डॉ. अंबादास कुलकर्णी,अमोल परिहार,नागेश कानाडे,बाबुराव राठोड उपस्थित होते

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!