ग्राहकाचे मनी पॉकिट चोरणार्‍यास पोलीसांनी दोन तासात केले गजाआड

59

मंगळवेढा : शिवाजी पुजारी

दुकानात बॅटरी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे 9 हजार 500 रू.चे मनी पॉकेट हातोहात लंपास करणार्‍यास पोलीसांनी दोन तासात जेरबंद करून मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बलभीम भगवान कुचेकर रा.धर्मगाव याच्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी धोंडीबा थोरबोले वय 54 रा.रड्डे हे दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वा.च्या दरम्यान बँक ऑफ इंडिया शाखा-भोसे येथून खात्यावरील 10 हजार रूपये काढून मंगळवेढ्यात बॅटरी(टॉर्च) खरेदीसाठी सायंकाळी 7.30 वा. फिर्यादी आले होते. दामाजी चौकातील पोस्ट ऑफिस शेजारी असलेल्या स्टेशनरी स्टॉलवर बॅटरी खरेदी केल्यानंतर त्याचे 60 रूपये देण्यासाठी पॉकिट काउंटर ठेवले. यादरम्यान काही क्षणातच काउंटरवरील मनी पॉकिट गायब झाल्याचे फिर्यादीचे लक्षात आले. फिर्यादीने याबाबत दुकानदाराकडे अधिक चौकशी केली. व येथे उभारलेला मुलगा कोण होता? असे विचारले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई शशिकांत चव्हाण, अजित मिसाळ, अजित सुरवसे, सागर लांडे आदींनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. व केवळ दोन तासात आरोपीला ताब्यात घेतले.

सुरूवातीला पॉकिट घेतले नसल्याचा कांगावा करणार्‍या आरोपी पोलीसी खाक्या दाखवताच मनी पॉकिट काढून दिले. पोलीसांनी 9 हजार 500 रूपयेंचे पॉकिट जप्त करून आरोपीला जेरबंद केले. अधिक तपास पोलीस नाईक सचिन पारधी करीत आहेत.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!