घागरभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट

12

नळदुर्ग : सचिन गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे एक जून पासून घागरभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती गेल्या दहा ते बारा दिवसापासून गावातील वीज पुरवठा बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस आल्यामुळे गावातील नागरिकांनी पावसाचे पाणी साठवून ठेवले होते पण पावसाचे पाणी फक्त वापरण्यासाठी गावातील महिलांनी उपयोग केला सलग तीन दिवस चिकुंद्रा येथील नागरिक महिला तसेच बालकांनी स्नान केल्याने अनेकांना त्वचा रोगाच्या आजाराला सामोरे जावे लागले व गावातील लहान मुलाचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले गेल्या दहा-बारा दिवसापासून चिकुंद्रा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील पाण्याची तसेच गावातील वीज पुरवठा सुरळीत न केल्यामुळे ग्रामपंचायतीवर नामुष्कीची वेळ आली आहे गेल्या बारा दिवसांपासून गावातील विज पुरवठा बंद असल्यामुळे विजेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे गेल्या अनेक दिवसापासून गावातील विज पुरवठा बंद असल्याने येथील नागरिकांना मोठा सामना करावा लागत आहे गावात गेल्या बारा दिवसांपासून वीज खंडित असल्याने गावातील पिठाच्या गिरण्या बंद आहेत. गावातील सर्वच लोकांचे मोबाईल बंद असल्याने संपर्क होत नाही गावात नवीन कोणी पाहुणे येत असतील तर आमच्या गावी येऊ नका आमच्या गावात वीज नसल्याने व पाणी नसल्यामुळे पाहुण्यांना येऊ नका मानण्याची नामुष्की गावातील नागरिकावर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून गावातील वीज पुरवठा बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी रात्र दिवस भटकंती करावी लागत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!