चाळीसगाव येथे कॅन्डल मार्च काढून शहीद जवानांना श्रद्धांजली

35,487

चाळीसगाव : सुभाष चौधरी

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशत वादी हल्याचा कॅण्डल मार्च काढून व शोकसभा घेवून शहिद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे। आणि पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे आयोजन श्री.ज्ञानेश्वर भोजने श्री.सुभाष चौधरी श्री.नीलकमल निषाद प्रमोद गोसावी यांनी केले होते. प्रसंगी सिग्नल चौकातुन कँडल मार्च ला सुरुवात करत हुतात्मा चौक (कॅप्टन कॉर्नर) येथील वीर हुतात्मा कोतवाल यांच्या स्मारकाला सी.आर.पी.फ जवान किरण पाटील व मुंबई पोलीस शंकर मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख श्री शैलंद्र भाऊ सातपुते यांनी मनोगत व्यक्त करताना ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत तरुणांना देशाविषयी आदर सम्मान व देशप्रेम याविषयी प्रोत्साहित केले.

ह्या कँडल मार्च मध्ये भारत पाटील , नितीन चव्हाण , तेजस पवार , अर्जुन वाकले ,भूषण पाटील, प्रशांत मुलमुले,मयूर बोरसे,प्रकाश महाजन उमेश शिंदे, आकाश पाटील, अजय राठोड, व्हिएक्स जाधव, अजय दास,सुनील अहिरे,शुभम जोशी,यश पाटील,रोहित राणा, ओम गवळी, जयदीप पाटील, मनोज कापडणे, उत्कर्ष देशमुख, सुरज चौधरी, अनिल सुर्यवंशी,गौरव पाटील,सुनील मोरे , रवी गवळी,सतीश गवळी,सोमा पाटील , विनायक जाधव नितीन राठोड,विजय जगताप, श्रीकांत महाले,राजू पाटील तथा शिक्षक श्री स्वप्नील भोसले व अन्य तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!