जनावरांची कत्तल करुन मांस व जिवंत जनावरे कब्जात बाळगणाऱ्या सहाजणांविरुध्द गुन्‍हा; नळदुर्ग येथील घटना

सुमारे  6 लाख 47 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

687

नळदुर्ग, दि. 14 : नळदुर्ग पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दिनांक 13.01.19 रोजी 23.25 वा. सु. कुरेशी गल्ली हसन कुरेशी यांचे घराजवळ नळदुर्ग येथे छापा टाकला असता 1) हसन बडेसाब कुरेशी 2) सिद्दीक बंदेअली कुरेशी दोन्ही रा. कुरेशी गल्ली नळदुर्ग ता. तुळजापुर 3) अबु तालेब कुरेशी 4) अबु ताहेर कुरेशी 5) एजाज हुसेन कुरेशी व इतर एक यांनी संगनमत करुन गोवंशीय प्राणी कापण्याचे उद्देशाने आपले ताब्यात गोवंशीय गावरान व जर्सी प्राणी बाळगुन तसेच जर्सी गाय व म्हैस विनापास परवाना कापलेले स्थितीत गोवंशीय मांस सह कब्जात बाळगलेले मिळुन आले सदर ठिकाणी मटण तोडण्याचे लाकुड, 4 चाकु, जिवंत व कापलेली , अर्धवट कापलेली जनावरे असा एकुण 6 लाख 47 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच पोलीसांनी छापा टाकुन जप्त केलेला मुद्देमाल वजन करुन परत येत असताना ट्रॅक्टर चालकास शिवीगाळ करुन त्यातील 260 किलो गोवंशीय मांस किं अं 36,400/- चा मुद्देमाल चार आरोपीतांनी बोलेरो महिंद्रा गाडीत घालुन चोरुन घेवुन गेले आहेत. म्हणुन पोलीस हवालदार शंकर भानुदास मोरे पोलीस स्टेशन नळदुर्ग यांचे फिर्यादवरुन 1) हसन बडेसाब कुरेशी 2) सिद्दीक बंदेअली कुरेशी 3) अबु तालेब कुरेशी 4) अबु ताहेर कुरेशी 5) एजाज हुसेन कुरेशी व इतर एक यांचे विरुध्द भादंविचे कलम 392,34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम 5(अ)(ब)(क),9(अ) सह महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औदयोगीक नगर अधिनियम 1965 चे कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!