जळकोट गावची जुनी पुजनीय वेस मोजत आहे शेवटची घटका

246

जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावची जुनी पुजनीय वेस शेवटची घटका मोजत आहे.जुन्या वेशीचे काहिसेच भाग शिल्लक राहिले आहे .लोक त्या जिर्ण भागाचीच श्रध्देने पुजाअर्चा करतात परंतु कोणीच त्या राहिलेल्या अवशेषाची काळजी घेताना दिसत नाहीत.

जुनेजाणते वयोवृद्ध वडिलधारी व्यक्ती सांगतात की, जळकोट हे मुख्य गांव वेशीच्या आतच वसलेले होते.वेशीची भलीमोठी चारखाणी ईमारत भलामोठा लाकडी दरवाजा होता,सायंकाळी सर्व गांवकरी आपापली शेतीची कामे उरकून घराकडे आली की वेशीचा दरवाजा आतून बंद केला जायचा,आणि रात्रभर एस्कर पहारेकरी गस्त घालायचे व डोळ्यांत तेल घालून रात्रभर वेशीच्या प्रवेशद्वारावर पहारा द्यायचे याचे आजही काही साक्षीदार जीवंत आहेत.गांवात कुठलेही शुभकार्य असो वेशीची पुजा करुनच पुढील कार्यक्रमास सुरुवात होत असे .जुने चिरेबंदी बांधकाम असलेली ही वेस एकेकाळी गावचे भूषण होती. कालांतराने त्या वास्तूचे काही प्रमाणातच अवशेष शिल्लक राहिले असून त्याचीच पुजा कोणत्याही मंगलप्रसंगी गांवकरी करतात.

अत्यंत जिर्ण अवस्थेत एक कमाणवजा बांधकाम शिल्लक आहे.आजही लोक त्यास पुजतात,मंगलप्रसंगी दिवे लावतात.आजही जुने वयस्कर मंडळी वेशीतून बाहेर जाताना जाताना वेशीचे त्या जिर्ण भागाचे दर्शन घेऊनच बाहेर पडताना दिसतात.

नवीन पिढीला तर वेस म्हणजे काय वास्तू होती हेदेखील समजणे कठीण आहे.अशी खंत काही नागरीक करतात.

पुर्वी संपुर्ण गांव वेशीच्या आतच होता परंतु ९३ सालाच्या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्थलांतर केले. परंतु आता जुन्या वेशीचे थोडेफार बांधकाम शिल्लक आहे त्याचे जतन करणे गरजेचे आहे .अशी मागणी गांवकर्यांतर्फे होत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!