ट्रक आणि अल्टो कार अपघातात सात जण ठार

5,287

तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर घाटातील वळणावर टॅंकर व कारचा विचित्र अपघात होऊन त्यात चार बालक दोन महिला व पुरुष असे एकूण सात जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले सर्व जखमींना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घाटशीळ घाटातील वळणावर तुळजापूर कडुन सोलापूर कडे जाणारा टँकर क्रमांक एम.एच.१३ आर ६५३७ व सोलापूर कडून येणाऱ्या कार क्रमांक एम एच १२ वाय ये ३६७२ यावर वरील टँकर पलटी होऊन कारमधील वर्षा लिंगराज अडम वय 12, रजनी प्रेमकुमार चिलवरे वय 35 ,शिवकुमार गोविंद पोबते वय 40 ,नर्मदा शिवकुमार प्रोबते वय 35, नेताजी शिवकुमार पोबते वय १२, श्रद्धा शिवकुमार पोबते वय 4 ,अपूर्वा प्रेम कुमार चिलवरे वय १३, यांचा समावेश असून तर नागेश जनार्दन केतम वय 32 ,मयुरी नागेश केतम 25, कृतिका शिवकुमार पोबते वय 15, श्रावणी भालचंद्र गडम वय आठ वर्ष हे सर्वरा.सोलापूर जखमी असून यांच्यावर उस्मानाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तरी सर्व मयत येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत काल रविवार दिनांक 17 रोजी कंटेनर आणि टँकर यांचा जो अपघात झाला होता त्याच वाहनाला हा टँकर धडकला व खालून येणाऱ्या कारवर पलटी झाला यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

रविवारी झालेल्या अपघातातील दोन्ही वाहन त्या जागची हटवली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती असे उपस्थित शहरवासीयांकडून चर्चा होत होती.

घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक अग्निशामक दलाचा वाहन व रुग्णवाहिका यांनी टाकता घेऊन पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कारवरील टँकर बाजूस काढून आतील सर्व मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले या घटनेमुळे सोलापूर रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आले असून उस्मानाबाद बायपास महामार्गावरून वळविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे कार मधील सोलापूर येथील कुंटुबीय श्री तुळजा भवानी मातेचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी श्री क्षेत्र तुळजापुर ला येत होते माञ काळाने त्यांच्यावर झडप घातली यामुळे तुळजापुर शहरातील नागरीक हळहळ करीत होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!