डिघोळ आंबा माध्यमिक शाळेत इयत्ता चौथी व सातवी विद्यार्थी जिज्ञासा कसोटी परीक्षा संपन्न

38

अंबाजोगाई : दत्ता खोगरे

अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ अंबा येथे
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यार्थी जिज्ञासा कसोटी परीक्षा दिघोळ आंबा प्रशाळेत दिनांक 30 एप्रिल 2019 रोजी इयत्ता चौथी व सातवी विद्यार्थी जिज्ञासा कसोटी परीक्षा शांततेत व सुरक्षित संपन्न झाली.

इयत्ता चौथी परीक्षेसाठी केंद्र संचालक श्री चव्हाण आर एच व उपकेंद्र संचालक म्हणून शेख सिराज यांनी तर इयत्ता सातवी साठी केंद्रसंचालक म्हणून श्री धायगुडे एस बी उप केंद्र संचालक म्हणून श्री रंजवे के एस यांनी काम पाहिले इयत्ता चौथीच्या एकूण 135 तर इयत्ता सातवीच्या 61 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली इयत्ता चौथीसाठी परिवेक्षक 10 तर सातवी साठी 5 पर्यवेक्षक उपस्थित होते परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच वाढलेल्या तापमानात विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आपेगाव चे कर्मचारी केंद्रावर उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री कवडे सी एन सर, रंजवे सर कदम सर, तौर सर, देशमुख सर लोमटे मॅडम, माने मॅडमव कोठाळे सर इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले परीक्षा केंद्रास केंद्रप्रमुख श्री देशपांडे आर एच व विषय तज्ञ श्रीमती सोनटक्के एस एम यांनी पूर्ण वेळ थांबून सर्व व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!