ढेकरी येथे किरकोळ कारणावरुन एकास मारहाण

48

तुळजापूर, दि. 23 : टक लावून का बघतोस असे विचारल्या वरून एकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील ढेकरी येथे सोमवार दि. 22 रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

शिवाजी मधुकर रोडे (35) हे त्यांचा मित्र हे मोहन गोरख देशमुख यांच्या हॉटेलात चहा पीत बसले असता ज्ञानेश्वर हणमंत काळे रा. ढेकरी हा त्यांचा कडे टक लावून डोळे वटारून पहात होता. त्याला असे का बघतोस म्हणून विचारले असता त्याने शिवीगाळ करून बाजूला पडलेला दगड उचलून डोक्यात घालून जखमी केले. या प्रकरणी शिवाजी मधुकर रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर काळे याच्या विरोधात तुळजापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– कुमार नाईकवाडी / तुळजापूर

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!