तुळजापुरात छञपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

17

तुळजापुर : कुमार नाईकवाडी

धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शहरातील शिव शंभु प्रतिष्ठान, शिवमुद्रा प्रतिष्ठान,व शंभुराजे प्रतिष्ठान च्या वतीने दि.१४ मंगळवार रोजी येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानात असलेल्या छञपती संभाजी महाराज यांच्या आष्वारुढ पुतळ्यास दुग्धा अभिषेक सोहळा व पुष्पहार अर्पन करवुन महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

तसेच छञपती संभाजी महाराज यांच्या जयंती निम्मीत शिव शंभु प्रतिष्ठान, शिवमुद्रा प्रतिष्ठान व शंभुराजे प्रतिष्ठान च्या वतीने भव्य पालखी सोहळा आयोजित करवुन श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीर परिसरात श्री देवीस दर्शनार्थ आलेल्या भाविकांना भव्य अन्न दान सोहळा करण्यात आला तसेच दुपारी रखरखत्या उन्हात भाविकांना थंड शरबत देण्यात आले.या भव्य दिव्य सोहळ्यात संभाजी प्रेमी महंत इच्छागिरी महाराज,किशोर पवार,संजय सोनवणे परिक्षित सांळुके,महेश शिंदे,विनित रोचकरी,कृष्णा काळे,तेजस माने सौरभ पवार आदीसह संभाजी प्रेमी उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!