तुळजापुर: भाविकांची गैरसोय टाळण्याची रोहन देशमुखांची मागणी

63
तुळजापुरःदि.२२, कुमार नाईकवाडी

नवरात्र महोत्सव, पौर्णिमा काळात शहाजी महाद्वारातून जाण्याची जुनी परंपरा मोडीत काढून मागील प्रशासनाने मनमानी कारभार केल्याने नागरीक, व्यापारी व भक्तांना होणारा त्रास लक्षात घेऊन भाजप युवानेते रोहन देशमुख यांनी दि २२ गुरुवार रोजी तुळजापूर तलसीलदार योगिता कोल्हे यांची भेट घेवून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.

नवरात्र महोत्सवात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरला पायी चालत येतात, मंदिराची जुनी परंपरा मोडीत काढून मंदिरातून बाहेर जाण्याचा रस्ता पाठीमागील शिवाजी महाद्वारातून केल्यामुळे लाखों भाविकांसोबतच व्यापारी, पुजारी व नागरिकांची गैरसोय होत आहे.

यामुळे मागील २-३ वर्षांपासून महोत्सव काळात सर्वानाच त्रास सहन करावा लागत आहे. यासर्व विषयांवर तहसीलदार कोल्हे यांच्याशी देशमुख यांनी केलेल्या चर्चेची बाजू लक्षात घेऊन सकारात्मकता दर्शवत यावर मार्ग काढण्यासाठी पुढील आठवड्यातच जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासमवेत बैठक करण्यासंदर्भात तहसीलदारांनी पुढाकार घेतला.

विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर सकारात्मक निर्णय व्हावा आणि भक्तांच्या भावना दुखावल्या जाऊ नये तसेच गैरसोय टाळावी यासाठी रोहन देशमुख यांनी पाऊल उचलले असून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत पुजारी व शिष्ट मंडळांसमवेत योग्य बाजू मांडून नागरिक व भक्तांच्या सोयीच्या मार्गासाठी चर्चा करण्यात येणार आहे.

यावेळी भाजप पदाधिकारी सत्यवान सुरवसे, गजानन वडणे, पंकज पाटील, दत्ता राजमाने, बालाजी शिंदे, बाबा वटेकर, मकरंद लबडे, शिवाजी सरडे, विजय शिंगाडे, दादा घोडके, सचिन अमृतराव, शिवाजी बोधले, सुहास साळुंके, उमेश गवते, अनंत भूरांडे, बाळू शामराज, बाळासाहेब भोसले, सचिन अमृतराव आदी उपस्थित होते.

प्रसंगी रोहन देशमुख यांनी माळुंब्रा ता.तुळजापूर येथील मंदिर संस्थांनच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत प्रकल्प उभा करण्याबाबत मंदिर संस्थानची जमिनीची मागणी केली असल्याची माहिती यावेळी दिली. तालुक्याचा रोजगार वाढावा, नवीन व्यवसाय सुरु व्हावे याबाबतही सकारात्मकता दर्शवून जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठकीत औद्योगिक वसाहतीच्या जमिनीसंदर्भात विषय घेण्याचे मान्य केले.
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!