तुळजापूर येथे घरफोडी करुन 25 हजाराचे सोने-चांदीचे दागिने लांबविले

74

तुळजापूर, दि. 3 : येथील सारा गौरव सोसायटी मधील घराचे मेन दरवाजा कुलूप तोडून अज्ञात चोरटयानी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असे मिळून 25 हजार रुपयाचे ऐवज लांबविल्यावरुन बुधवार रोजी तुळजापूर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार दि. 2 जानेवारी रोजी पहाटेपूर्वी वरधराज जयंत कांबळे, रा. यादव हॉस्टीपलसमोर, लातूर रोड, तुळजापूर यांचे सास-यांचे सारा गौरव सोसायटी तुळजापूर येथील घराच्या दरवा-याचे कूलुप तोडून आत प्रवेश करुन कपाटातील रोख रक्कम 13 हजार रुपये व सोने-चांदीचे दागिने असे मिळून एकूण 25 हजार रुपयाच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. वरधराज कांबळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!