तुळजापूर येथे जुगार अड्डयावर छापा; सुमारे 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

229

तुळजापूर, दि. 29 : तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर पोलिसांनी छापा मारून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कमेसह २ लाख २० हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाही दि.२८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुर्गा भक्त निवास येथे केली असून पोलीस ठाण्यात भक्त निवास मालकाने जुगाऱ्यांना जाणीवपूर्वक जागा उपलब्ध करून दिल्यावरून मालकासह नऊ जुगाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,तुळजापूर येथील दुर्गा भक्त निवास येथे रविंद नागेंद्र गोगी,हरीप्रसाद नरसप्पा बंडी, गोपाळ मल्लया रापेरी,शिवकुमार अशोक गोगी,बालाजी सुदर्शन माला,श्रीनिवास नामदेव चिप्पा,अशोक लक्ष्मण विडब, मनोज दत्तात्रय साळुंखे, रमेश नागेश गोगी हे गोलाकार बसून पैशावरती तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना रोख रक्कम ९५हजार६७० रुपये ,वेगवेगळ्या कंपनीचे ११ मोबाईल १लाख२४हजार रुपये किंमतीचे असे एकूण २लाख२०हजार४७०चे मुद्देमाल सह रकमेसह मिळून आले तसेच पैशावरती पत्याच्या तिरट जुगार खेळण्या करिता जाणीव पूर्वक दुर्गा भक्त निवास येथील इसम याने जागा उपलब्ध करून दिल्यावरून पोलीस ठाण्यात पो ना अतुल यादव यांच्या फिर्यादीवरून वरील नमूद नऊ जणांसह दुर्गा भक्त निवास चे मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो ना सोनके हे करीत आहेत.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!