दुधनी येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित आयोजित रक्तदान शिबिरात 166 रक्तदात्यानी केले रक्तदान

17

अक्कलकोट : गुरुराज माशाळ

अक्षय तृतीया आणि महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दिनांक ०३ मी रोजी सकाळी श्री बसव प्रतिष्ठान दुधनी तर्फे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या भव्य मूर्तीचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत नियोजित स्थळी आणून बैलदुधनीतील प्रतिष्ठीत शेतकरी सातलिंग गिणी, गुंडप्पा त्रिमुख व इतर शेतकऱ्यांचा हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी जगज्योती बसवेश्वर महाराज कि जय, महात्मा बसवेश्वर महाराज कि जय या जयघोषाने संपूर्ण परिसर बसवमय झाला होता.

दिनांक ०५ मे रोजी दुधनी येथील जिल्हा परीषद प्राथमीक शाळेत श्री बसव प्रतिस्ठानच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराचे उदघाटन बसवेश्वरांचे फोटो पुजन दुधनी विरक्त मटाचे म.नि.प्र. डाँ.श्री शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.शांतलिंगेश्वर महास्वमिजींचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महास्वामीजी यांच्या उपस्थितीत भीमाशंकर धोडमनी या रक्तदात्याचा रक्तदानाने शिबिराचे सुरुवात करण्यात आली.

या वेळी दुधनी मटाचे स्वामीजींनी आपल्या आशिर्वचनात स्वामीजी म्हणाले कि, प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे कारण रक्तदान हा श्रेष्टदान असून रक्तदानामुळे अनेकांचे जिव वाचतो म्हणुन रक्तदानाला मोठा महत्व आहे. रक्तदानाचे महत्व काय आहे हे लोकाना पटवून देवून रक्तदान करण्यास प्रव्रूत्त करावा श्री बसव प्रतीस्ठान दुधनी यानी जो उपक्रम राबविला आहे तो कौतुकास पात्र आहे असे या प्रसंगी महास्वामीजी म्हणाले.

या वेळी बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्लीनाथ येगदी, उपाध्यक्ष उमेश सावळसूर, इरय्या पुराणिक, सुगेश बाहेरमठ, भिमाशंकर अंदेनी, लक्ष्मीपुत्र कणी, महांतेश बिराजदार, मंजुनाथ दैनक, सतीश टक्कळकी, शरण सुतार, अभिषेक पोतदार, शांतलिंग कोगनूर, संजय नूला, जगदीश माशाळ, प्रशांत लोणी, संतोष पोतदार, प्रशांत पंडित, सुनील भाईकट्टी, संगमेश बीदनूर, संतोष परमशेट्टी, राजशेखर कामनल्ली, शांतलिंग वागदरगी, शांतलिंग परमशेट्टी, ईरणा सिन्नुर, हनमंत कलशेट्टी, संजय खंडाळ, गुरुशांत मगी, राघवेंद्र रजपूत, बसवराज मालगत्ती, यांच्या सह श्री बसव प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात सोलापुर येथील डाँ.हेडगेवार रक्त पेढीचे व्यवस्थापक श्री प्रताप रणभोर, डाँ.हरिश्चंद्र गलीयाल डॉ.सत्यनारायण गुंड्ला, डॉ.शैलेश पटणे, दिलिप बनसोडे, प्रकाश कोंडा, अमृता चव्हाण, भास्कर शिंदे, बसवराज देसाई,राहुल मस्के, संगीता मेंथे, रुपाली आलीगावे, पार्वतीबाई कोळी इत्यादीनी या शिबिरात काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसव प्रतीस्ठानचे सर्वपदाधीकारी, सदस्य,यानी परीश्रम घेतले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दुधानीतील सर्व बसव भक्तांनी अथक परिश्रम घेतले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!