दुष्काळामुळे बेरोजगार युवकांच्या संख्येत वाढ

10

अंबाजोगाई : दत्ता खोगरे

शेतीतून उत्पादन काढ्याचे ठरवले तर शेतीला पाणी नाही निर्गाच्या भरोशावर पेरणी केली तर उत्पादित मालाला भाव मिळत नाही. हमीभाव केंद्र नावालाच अंबाजोगाई तालुक्यात असणारा साखर कारखाना एक वर्ष किवा दोन वर्ष बंद राहातो. प्रत्येक दोन तीन वर्षाने येणार दुष्काळ शास्वत पाण्याचे स्तोञ नसल्याने मोठे उद्योग-धंदे नसल्याने बेरोजगाराची कु-हाड कोसळली आहे
दुष्काळी परिस्थितीचा सामाना करत करत आर्थिक गणित दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे बेरोजगारांची संख्या वाढत आहे.

शासनाच्या दोन कोटी रोजगारांचा कूठेच पत्ता नाही यामुळे या भागात विवाहाकरीता मुली देण्यास मुलीकडील मंडळी परस्थितीची पाहाणी केल्याशिवाय मुली देण्यास राजी नसतात असे चिञ पाहाण्यास मिळते लोकप्रतिनिधीनी एमआयडीसी साठी व कृष्णा -उजणीच्या मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाही करणे गरजेचे आहे निवडणूकी पुरता मुद्दा नको गेल्या तीस -चाळीस वर्षीपासुन पाणी येणार व एमआयडीसी होणार असे एेकवले जाते काम धंदा नसल्याने जगणे मुश्किल झाले आहे महागाई वाढतच चालली आहे निसर्गाचे चक्र बिघडले आहे पर्यावरणाचा समतोल -हास पावतांना दिसत आहे

उच्चशिक्षितांवर तर नोकरीच्या शोधात बेकार होऊन फिरण्याची वेळी आली मोठमोठ्या कंपन्या बंद पडत आहेत बीसएन एल ही शासनाची कंपनी बंद पडण्या मार्गावर आहे तसेच व एेअर इंडिया कंपनी बंद पडत आहे रोजगारांचा प्रश्न गंभीर बनत आहे बी.एड,डी.एड, एम.ए,अभियंते, पदवीधारक,व्यावसायिक शिक्षण घेवून नौकरी मिळत नसल्याने तरूणांत निराशाजक चिञ दिसत आहे त्यामुळे तरूणांतअधिक व्यसनाधीनता व चैनखोर वृत्तीत वाढ झालेली दिसत आहे पदवीधर असल्याने अकुशल काम करण्यास नको वाटते असे चिञ सर्रास पाहाण्यास मिळत आहे.

बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून मुद्रा लोन योजना राबविल्या या योजनांचा लाभ राजकिय बगल बच्चे कपंनीलच मिळाले सर्व सामान्य कुटूंबातील तरूणाला या योजनांचा लाभ मिळाला नाही यामुळे युवकांत नाराजीचे वातावरण आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!