दुष्काळी भागात मागेल त्याला शेततळे

57

मुंबई, दि. 18 : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर केला जाणारा हा अतिरिक्त अंर्थसंकल्प आहे. यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारनं 4563 कोटी रूपये दिल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. तर, शेतकऱ्यांना 4461 कोटी रूपयांचं अनुदान दिल्याची माहिती देखील यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आतापर्यंत 66 लाख शेतकऱ्यांना कर्ज वाटप केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. 18659 गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झाल्याची माहिती यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसंच चारा छावण्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती यावेळी मुनगंटीवार यांनी दिली.

▶2019-20 मध्ये 25000 शेततळी करण्याचे उद्दिष्ट
▶सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी 350 कोटी
▶जलयुक्त शिवारासाठी 8946 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत
▶जलसंपदा खात्यासाठी 12597 कोटी रुपये प्रस्तावित आहेत
▶ दुष्काळी भागातले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
▶शेतकरी अपघात योजनेसाठी 210 कोटी
▶कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद, मागील 4 वर्षात 140 सिंचन योजना पूर्ण करण्यात आल्या.
▶8946 कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत खर्च
▶ 260 सुधारित सिंचन प्रकल्पाची कामं प्रगती पथावर
▶ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येईल
▶जमिन महसूलात सूट
▶शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीला स्थगिती
▶कृषीपंपाच्या चालू वीज देयकात 33.5 टक्के सूट
▶शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
▶टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करण्याचा निर्णय
▶काजू व्यवसायासाठी 100 कोटी रुपये
▶139 गोशाळांना प्रत्येकी 25 लाख देणार
▶4 कृषि विद्यापीठांसाठी 600 कोटींची तरतूद
▶दुष्काळी भागात मागेल त्याला शेततळे

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!