नळदुर्ग तालुका निर्मितीची आशा पल्लवित; पहिला टप्पा तहसिल कार्यालयाचा

313
नळदुर्ग दि.२१, शिवाजी नाईक
नियोजित नळदुर्ग तालुका निर्मितीचे पाच दशकापुर्वी पासुन भिजत घोंगडे प्रकरणी महसुल मंञी तथा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी प्राधान्याने ” नळदुर्ग ” चा विचार केला जाईल असे तुळजापूर येथे गुरुवारी जाहिर सभेत सांगुन अप्पर तहसिल कार्यालय लवकरच सुरु करण्याचे सांगितले .
नळदुर्ग शहर बालाघाट डोंगराच्या कुशीत, राष्ट्रीय महामार्गावर वसलेले , ऐतहासिक वैभवशाली परंपरा असलेले शहर आहे. नळदुर्गचा किल्ला व पाणी महाल या दोन ऐतिहासिक गोष्टी नळदुर्गचे महत्त्व पटवून देत आहेत.

जिव्हाळ्याच्या विषय असलेल्या नळदुर्ग तालुका निर्मितीची चातका प्रमाणे वाट पाहणा-या नळदुर्गकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याचे कारणही तेवढेच भावनिक आहे. सन १९९९ मध्ये युती शासनाने २८ तालुक्यांची निर्मिती केली होती. माञ त्यावेळी नळदुर्गला डावलण्यात आले होते.आणि त्यावेळी सर्वपक्षिय आंदोलन करण्यात आले असतान भाजपाचे शहराध्यक्ष विरेशाप्पा डोंबे यांचा आंदोलनादरम्यान भाषण करताना भावना अनावर होऊन १३ मे १९९९ रोजी त्यांचा मृत्यु झाला. या घटनेस १८ वर्ष उलटले आहेत. असे असताना सद्यस्थितीत भाजपची सत्ता राज्यात व केंद्रातही असल्यामुळे आपल्या पदाधिका-यास श्रध्दजली म्हणुन नळदुर्ग तालुका करण्यास सरसावतील अशी भाजपकडुन नळदुर्गकरांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नळदुर्ग तालुका निर्मितीसाठी सर्व पक्षीय पदाधिका-यानी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरदचंद्र पवार, सुधाकरराव नाईक, ए.आर.अंतुले, नारायण राणे या सर्वांना वेळोवेळी भेटुन पाठ पुरावा केला माञ या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले

सन १९९९ मध्ये सत्तांतरानंतर मोठया भावाच्या भुमिकेत असलेल्या शिवसेनेने आपला आमदारअसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा व वाशी या दोन ठिकाणी तालुक्याचा दर्जा दिला. माञ आजघडीला युतीच्या सरकारात भाजप मोठया भावाच्या भुमिकेत आहे.

नळदुर्ग येथे एके काळी विभागीय कार्यालय होते. इ.स. 1904 पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे केंद्र तर 1909 पर्यंत येथे तालुक्याचे केंद्र होते. तुळजापूर तालुक्याचे मुनसफ कोर्ट नळदुर्ग येथे ठेवले. ते 1909 ते 1951 पर्यंत नळदुर्ग येथे होते. दोन दशकापुर्वी जवळपास शंभर ग्रामपंचायतीने ठराव करुन स्वतंत्र नळदुर्ग तालुक्याची मागणी केली आहे.

नळदुर्ग भारतीय जनता पार्टी,भाजपा युवा मोर्चा व नागरिकातुन नळदुर्ग येथे तहसीलचे उपकेंद्र व्हावे हे अत्यंत जिव्हाळ्याची मागणी होती, तुळजापूर मेळाव्यात महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील ही प्रलंबित मागणी पूर्ण करत असल्याची घोषणा केल्यामुळे नळदुर्ग व परिसरातील 60 ते 70 गावांना याचा फायदा होणार असून येत्या काळात नळदुर्ग तालूका होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्याबद्दल युवा मोर्चा व शहरवासीयांच्या वतीने सरकारचे तसेच भाजपच्या सर्व नेत्यांचे आभार.

– श्रमिक पोतदार , अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!