निलेगाव येथे दोन गटात मारहाण; 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल

344

नळदुर्ग, दि. 10 : निलेगाव ता. तुळजापूर येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 9 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाचे मिळून अकरा जणांविरुध्द नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वजोद्दीन महेबुब इनामदार (वय 55 वर्षे), हमीद‍ गिनान कुरणे (वय 50 वर्षे) यांच्यासह तिघेजण जखमी झाले आहेत. तर मुस्ताक गुलाब इनामदार, इलियास मुस्ताक इनामदार, राईस मुस्ताक इनामदार, मोशीन वैजुद्दीन इनामदार, वैजोद्दीन महेबुब इनामदार, अरबाज खाजा इनामदार, हमीद गिनन कुरणे, अजिम हमीद कुरणे, नजिम हमीद कुरणे, अकेलाबी हमीद कुरणे (सर्व रा. निलेगांव, ता. तुळजापूर) असे दोन्ही गटातील गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत.

निलेगाव ता. तुळजापूर येथील हमीद कुरणे हे मोटारसायकलवरुन जात असताना मुस्ताक इनामदार, इलियास इनामदार, राईस इनामदार, मोशिन इनामदार, वैजोद्दीन इनामदार, अरबाज इनामदार यांनी हमीद यास थांबवून तू लय माजला आहेस, ऊसाची मुकादमी करु लागलास, तू नेहमीच आमच्या कुठल्याही व्यवहारात अडचण आणतोस असे म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व कु-हाडीच्या दांडयाने हमीद व त्याच्या मुलास मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी हमीद कुरणे यांनी नळदुर्ग पोलिसांत फिर्याद‍ दिल्यावरुन वरील सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे हे करीत आहेत.

तर दुस-या गटाचे वजोद्दीन इनामदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निलेगाव येथील हमीद कुरणे, अजिम कुरणे, नजिम कुरणे, अकेलाबी कुरणे यानी संगनमत करुन वजोद्दीन इनामदार यांना तुझ्या मुलाने मला गावात मारले असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन डोक्यात दगड मारुन जखमी केले. यावरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मोरे हे करीत आहेत.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!