नेर तालुक्यात मतदारांशी प्रेमासाई महाराजांनी केली चाय पे चर्चा

50

यवतमाळ : सुशील भगत

यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुक प्रचाराचे पड़घम वाजताच प्रमुख उमेदवारानी प्रचार सुरु केला आहे. या मतदार संघातुन आध्यात्मिक गुरु म्हणून परिचित असलेले प्रेमासाई महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. दि. 31 मार्च रोजी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथून चहा पिता पिता चर्चा व सम्पर्क अभियाणाची सुरुवात केली.

या अनोख्या व जनसामान्यांची भेटिगाठी साठी सुरु केलेल्या या अभियानादरम्यान त्यांना सर्वच स्तरातून जनता व युवकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

नेर शहर व ग्रामीण भागात अपक्ष उमेदवार प्रेमासाई महाराज यांनी आपल्या हातुन नागरिकांना चहा देत या भागातील समस्या व जिल्ह्यातील शेतकरी,विकासाच्या प्रश्नांवर या विषयावर संवाद साधत लोकसभेकरीता निवडून देण्याचे आवाहन केले.

या सम्पूर्ण अभियाना दरम्यान प्रेमासाई महाराज यांचे नागरिक महिला पुरुषांकड़ून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत युवा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!