पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरीत अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करु – खा.डॉ.जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी

खा.डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी व आ. प्रशांतराव परिचारक यांना पत्रकार संरक्षण समितीचे निवेदन

47

पंढरपूर, दि. 15 : पत्रकार संरक्षण समिती, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने दि. 14 जून रोजी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे नुतन खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी व सोलापूर जिल्हा विधानपरिषद सदस्य आमदार प्रशांतराव परिचारक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरीत अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.

पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पहाता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पञकारितेचे अस्तित्व आपल्या राज्यात धोक्यात येत आहे. यासाठी आपण महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळींनी वरील विषयात जातीने लक्ष देऊन राज्यातील ग्रामीण व शहरी पञकारांच्या न्याय व हक्कासाठी पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरीत होणेसाठी आपापल्या पातळीवर पाठपुरावा करावा. अशी विनंती खा.महास्वामी व आ. परिचारक यांना पत्रकार संरक्षण समिती, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, प्रसिध्दीप्रमुख धीरज साळुंखे, सदस्य उमेश टोमके, दत्ताजीराव पाटील, रामकृष्ण बीडकर आदी उपस्थित होते.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असून पञकार बांधव हे चौफेर घडत असलेल्या चालू घडामोडी योग्य रितीने, पारदर्शकपणे राज्यातील नागरिकांपुढे मांडण्याचे काम सातत्याने करित आहेत. परंतु काही समाज कंटक हे पञकारांनी छापलेल्या बातमीचा राग मनात धरून पञकारांवर किंवा कार्यालयावर हल्ले करित आहेत. यासंदर्भाचे राज्यातील जिवंत उदाहरण सांगायचे असल्यास परभणी जिल्हातील दै. लोकमत , दै. सामना या वृत्तपञाचे पञकार प्रवीण मुळी व प्रशांत मुळी यांच्या संपूर्ण कुटूंबिंयांना राञी झोपेतच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर रायगड येथील शेकाप चे आमदार जयंत पाटील यांनी दै. लोकसत्ता या वृत्तपञाचे अलिबाग प्रतिनिधी हर्षद कशालकर यांच्यावर केलेला भ्याड हल्ला असे कित्येक हल्ले पञकारांवर होत आहेत.

पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व संस्थापक सचिव अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील आमदार, खासदार व मुख्यमंत्री यांना पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सध्या निवेदने देण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निवेदने देवुन पत्रकार संरक्षण कायदा मंजुरीसाठीचा पाठपुरावा सुरु आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!