पाणी फाॅऊंडेशनच्या श्रमदानात शिवशींपी समाजाचा सहभाग

110

अक्कलकोट : गुरुराज माशाळ

बुधवार दि. ०१ मे रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले या गावात श्रमदान साठी सहभागी होऊन दुष्काळ मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहे. शिवशिंपी समाजातील युवक, युवती, महिला,व समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

शिवशिंपी युवक प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने पानी फौंडेशन यांचें महाराष्ट्रतील पाणी टंचाई दीर्घकाळ दुष्काळमुक्त करण्यासाठी हे एक लोकसहभागातून श्रमदान हे उपक्रम राबविले जात आहे या उपक्रमात शिवशिंपी युवक प्रतिष्ठान सहभागी झाले आहे.

या वेळी भारत माता की जय, जय जवान जय किसानचे नारे देत शिवशिंपी समाज युवक प्रतिष्ठानचे युवकांनी श्रमदान केलं.

श्रमदानासाठी युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवानंद नागुणसुरे, अभिषेक दुलंगे, महेश भाईकट्टी, सचिन बुरणपुरे, गणेश येळमेली, रोहित शिवणगी, राहुल सावळगी, सोमनाथ कालदीप, शिवानंद भाईकट्टी, शुभम जमाणे, महालिंग दुलंगे, संकेत तालिकोटी, धनंजय ममदापुरे, सिद्धराम नारोणे, श्रीकांत तालिकोटी, संदीप कुलकर्णी, स्मिता नाईक, सुनंदा भाईकट्टी, व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!