पारंपारिक लोककलेवर दुष्काळामुळे सावट

36

अणदुर : दयानंद काळुंके

गावाशेजारी मांडलेले त्यांचे छोटे छोटे पाल ,पालाच्या आजूबाजूला फिरणारी उघडीनागडी पोरे ,पालाच्या बाजूला तीन दगड मांडून केलेली चुल,त्यावर शिजत असलेले मटण, कुत्रा आणि डुक्कर यांची बैठक ,बैठकीतून होणारा त्यांचा गोंधळ ,दोन तीन साड्या एकत्र करून दंड घालूनअंग झाकलेली माझी मर्गमा माय, पहाट होताच आपले गाव, आपली वस्ती ,निवडून भीक मागण्यासाठी त्यांची पालं रिकामे होतात ,आंघोळीचा पत्ता नाही दारोदारी फिरून नासके, कुचके, शिळे अन्न पदरात घेऊन ते सकाळचा नाश्ता कुणाच्यातरी दारात करतात आणि उरलेले अन्न घराकडे घेऊन येतात, त्यांना त्यांच्या बालपणाची जाणीव नसते आपले बालपण ते हरवून बसतात आपण कसे घडत आहोत कसे जगत आहोत, आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे, बाहेरचे जग कसे आहे ,आपण एका अघोरी डबक्यात पडलोय की काय या बद्दलचे फार मोठे अज्ञान त्या बालकांमध्ये पाहायला मिळते.

भीक मागून आल्यानंतर ते शिकारीसाठी जातात ,कुत्र्यांचा कळप घेऊन डुक्कर ,ससे, रान डुक्कर, हरणे अशी शिकार करून खात असतात , मानवाच्या मुलभूत पाच गरजा आहेत अन्न, वस्त्र ,निवारा, आरोग्य, आणि शिक्षण या सगळ्या घटकापासून चार कोस लांब असलेला हा समाज आहे, शाळेकडे त्यांनी पाठ फिरवली आहे मुलगा असो वा मुलगी त्यांना भीक मागायला लावणे, गाणी म्हणायला लावणे ,घशातून वेगवेगळे आवाज काढायला लावणे ,लोकांच्या पाया कसे पडायचे त्यांना पैसे कसे मागायचे हे यांचे शिक्षण दिले जाते, आणि मुलगी नऊ ते दहा वर्षाची झाली तर तिचे लग्न करायचे बाराव्या-तेराव्या वर्षी ती आई होते, बगलेत बाळ घेऊन डोक्यावर टोपलीत देव ठेवून दोन्ही हाताने टारबुम टटाराम वाजवून डोक्यावर देवाची पेटी घेऊन वाद्य वाजवणे असा हा त्यांचा जीवनक्रम चालू आहे
पावसाळा ,हिवाळा ,उन्हाळा ही तिन्ही ऋतू त्यांना सारखेच वाटतात, कोणीही कोणाच्या जीवावर बसून खात नाही, कुणी फुगे, पिना, खवण्या, सुया,बिबं, दाभण ,विकून तर कुणी महिलांचे सौंदर्य प्रसाधने विकून पोट भरतात ,फिरत्या जनरल स्टोअर सारखे व्यवसाय करून पोट भरतात.

कोणी पोतराजाचा खेळ करून जगत असतो , तर कोणी मर्गमा देवीची डोक्यावर पेटी घेऊन गावोगाव दारोदारी हिंडून आपला खेळ दाखवून देवावरची श्रद्धा दाखवून जगत असतात, शासनाच्या विविध योजने पासूनही हा समाज दूर आहे त्यांना लवकर नागरिकत्वही लाभत नाही ,राहायला जागा मिळत नाही, घर नावावर झालेच तर शासनाची घरकुलाची योजना पदरी पडत नाही ,रेशन कार्ड मिळत नाही त्यामुळे धान्य त्यांना मिळत नाही, त्यामुळे भीक मागणे हे अजून त्यांचे सुरूच आहे.

आमचा डोक्यातील गुंता शेजारीन सोडवु शकत नाही पण वर्षाला एकदा येणारी मर्गमा देवीच्या रूपातील म-याई लहान मुले बरी व्हावी, त्यांना खोकला ,ताप, गोवर , कांजण्या होऊ नये म्हणून बाळ सुखी रहावं सशक्त राहावं म्हणून मर्गमा देविला साकडे घालते, हा त्यांचा खेळ गल्लोगल्लीत वर्षातुन पाहायला मिळतो पण दुष्काळाचे सावट असल्यामुळे त्यांना म्हणावं तसं धान्य, अन्न, पैसा मिळत नाही, या दुष्काळामुळे लोकांच्या दातृत्वाला लगाम लागला आहे ,लोकांच्या भिकेवर लोकांच्या दानधर्म वर, त्यांचे आयुष्य त्यांच्या कुटुंबाचे संगोपन अवलंबून आहे ,लोकांना दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांच्या शेतात ज्वारी पिकली नाही ना गहु, भुईमूग पिकले नाही त्यामुळे सर्वसामान्यांच्या हातामध्ये पैसा आज खेळत नाही ,आज उस्मानाबाद जिल्ह्यातील अशा अनेक लोक कलावंतावर व त्यांच्या कलेवर दुष्काळाचे सावट पडले असुन,उन्हात पोटासाठी भटकणाऱ्या कलाकाराचा शोध घेऊन जिल्ह्यातील शासन व स्वयंसेवी‌ संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांचा समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!