पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना इ – फेरफार सातबारा मिळेना

33

नळदुर्ग : सचिन गायकवाड

खरीप हंगामाचा पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना लागत आहे ७/१२ व ८ अ ची नक्कल त्यासाठीच सुरू करण्यात आलेले शासनाचे तलाठी ई फेरफार सर्वर डाऊन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ७/१२ व ८ अ उतारे मिळत नसून सर्वच या गोंधळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सर्वर डाऊन च्या समस्येकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे .

शेतकऱ्यांचे ७/१२ व ८ अ उतारे शासनाच्या महा ईमेल सेवा केंद्रावर तसेच तसेच विविध संकेतस्थळावर मिळण्याची सुविधा होती परंतु सेतू महा ई सेवा केंद्र तसेच संग्राम केंद्र चालक यांनी स्वाक्षरी व शिक्का दिलेले संगणीकृत ७/१२ व ८ अ उतारे यांचा अनाधिकृतपणे वापर सुरू होता. ही बाब एन आय सी च्या ( राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ) निदर्शनास आले होते त्यानंतर पुण्याच्या जमाबंदी आयुक्ता तथा भुमिअभिलेख
१९ जून २०१९ रोजी सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्र काढून सेतू महा ई सेवा केंद्र तसेच संग्राम केंद्र चालक यांनी साक्षांकित प्रती देऊन त्यावर शिक्का व स्वाक्षरी केलेले ७/१२ व ८ अ उतारे शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्याचे सांगितले.

त्यानंतर अधिकृत संगणीकृत ७/१२ व ८ अ उताऱ्यासाठी ई-फेरफार प्रकल्प सुरू केला. त्या प्रकल्पाचे वापरायचे अधिकार संबंधित तलाठ्याला देण्यात आले आहेत. आता पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामाचा पिक विमा भरण्यासाठी ३१ जुलै शेवटची मुदत असल्याने शेतकरी तलाठ्याकडे धाव घेऊन ७/१२ व ८ अ उताऱ्याची मागणी करत आहेत. परंतु तलाठ्यांचे ई – फेरफार सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. दरम्यान शासनाने पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ केली तरी आज घडीला शेतकऱ्यांना तलाठी सज्जाला हेलपाटे मारावे लागत आहे. ७/१२ व ८ अ उतारे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तलाठी सजा वरती गर्दी पाहायला दिसून येत असून वेळेवर सात बारा आठ उतारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला तलाठ्यांना सामोरे जावे लागत आहे.

अशा सततच्या सर्व्हर डाऊनमुळे अनेक शेतकरी खरीप हंगामाचा पिक विमा भरण्यापासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहणार की काय अशी भीती शेतकर्‍यांना वाटत आहे.

तुळजापूर तालुक्यातील किलज तलाठी सज्जा अंतर्गत किलज चिकुंद्रा व परिसरातील तांडे आहेत दि.९ रोजी पर्यंत सातबारा व आठ उतारे सर्वर डाऊन च्या परिणामामुळे ८०० सातबारे उतारे शेकडो शेतकऱ्यांना मिळाली नाहीत सातबारे उतारे घेण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसभर कामधंदा सोडून तलाठी कार्यालयात ठाण मांडून बसावे लागत आहे.

‌‌होर्टी ता. तुळजापूर येथील तलाठी सज्जा अंतर्गत मुर्टा व होर्टी परिसरातील तांडे असल्याने येथेसुद्धा सर्वर डाऊन चा फटका शेतकऱ्यांना बसला आहे होर्टी तलाठी कार्यालयांतर्गत जवळपास ३५० सातबारे आठ उतारे सर्व डाऊन असल्यामुळे येथे सुद्धा शेतकऱ्यांना दोन-तीन दिवस वाट पाहावी लागत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!