पैशाच्या कारणावरुन एकास मारहाण; ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

64

तुळजापूर, दि. २७ : पैसे देण्याघेण्याचा कारणावरून एकाला चाकू, कुर्‍हाड व गजाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील अमृतवाडी येथे दि. 22 ऑक्टोबर सकाळी 10:15 च्या सुमारास घडली. या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद वसंत दळवे रा. अमृतवाडी यांना किरण दयानंद चितळे, दत्ता रमेश जाधव, विश्वास विलास जाधव, बाळू शांमराव जाधव, प्रशांत कैलास भोंगे सर्व रा. अमृतवाडी यांनी चाकू कुर्‍हाड व गजाने डाव्या दंडावर, पायाच्या नडगीवर ,उजव्या खांद्यावर मारून गंभीर जखमी केले तसेच लाथा बुक्क्यांनी मारून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एम एल सी जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– कुमार नाईकवाडी / तुळजापूर

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!