प्रत्येक गावात ‘उद्योजक’ होणे ही काळाची गरज – बळीराम साठे

268

काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार समजले जाणार्‍या तामलवाडी येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर श्रीहरी कृपा टायर्सच्या वतीने उद्योजक विश्वास साठे व मनोज मोहिते (वडाळा ता.उत्तर सोलापूर ) या दोन मित्रानी सुप्रसिद्ध एमआरएफ कंपनीच्या शोरूमचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बळीराम (काका ) साठे व एमआरएफ टायर्सचे डिस्ट्रिक मॅनेजर प्रदीप समाधीया यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या शोरूमला साताऱ्याचे आमदार नरेंद्र पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

उद्धघाटन प्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बळीराम (काका) साठे यांनी नवीन उद्योगास शुभेच्छा देऊन म्हणाले की, , सध्या विविध खाजगी कंपन्या यांत्रीकीकरण व ऑटोमेशनवर भर देत आहेत. त्यामुळे नौकर्‍यांची संख्या कमी होत आहे. शेतीसुध्दा पहील्या सारखी राहिली नसुन शेतीमध्ये सुध्दा नवनवीन यांत्रीकीकरण करण आल्यामुळे कामगारांना सुध्दा कामे शेतातील कमी झाली असून तरुणांनी यापुढे नौकरी करण्यापेक्षा नौकरी देणारे बनण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून तामलवाडी येथे सुरू करीत असलेले दोन्ही मित्र पश्चिम महाराष्ट्रातील असले तरी त्यांनी तामलवाडी येथे सुरू केलेल्या एमआरएफ टायर्स शोरूम या नवीन उद्योगास सहकार्य करण्याचे आवाहन करीत पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने बेकारीची संख्या वाढत आहे. तामलवाडी सारख्या विविध गावात स्थानिक गावपुढार्‍यांनी उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करावेत व तरुणांना उद्योगाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी एमआरएफ टायर्सचे डिस्ट्रीक मॅनेजर प्रदीप समाधीया सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम ( काका साठे, सोलापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष शहाजी पवार, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित पवार, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र धुरगुडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, डॉ. अनिल कुलकर्णी, प्रकाश चोरेकर, तामलवाडीचे जिल्हा परिषद सदस्य शहाजी लोंढे, सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच दत्तात्रय वडणे, भाऊसाहेब लामकाने, उद्योजक विश्वास साठे, मनोज मोहिते, बसवणप्पा मसुते, सयाजीराव देशमुख, सुजित हंगरगेकर, करीम बेग, पत्रकार हरिभाऊ घाडगे, दत्तात्रय शिंदे, दत्ता मोकाशी, उमाजी गायकवाड, विठ्ठल नरवडे, विठ्ठल गुंड, ग्रा.पं. सदस्य बापुसाहेब पाटील, शिवदास पाटील, सुभाष जाधव, सेल्स मॅनेजर अक्षय कोलते. प्रकाश माडेवार, महादेव लोहार आदी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!