प्रशासनाच्या निषेधार्थ नळदुर्ग येथे लहुजी शक्ती सेनेचा रास्ता रोको

64
नळदुर्ग दि.२१ ,

बोरगाव तुपाचे ता.तुळजापूर येथिल एका दलित कुंटूबियास शिवीगाळ करुन मारहाण ,जीवे मारण्याची धमकी देवुन घर उध्वस्त केल्याप्रकरणातील आरोपीना अटक करा, पिडीत कुंटूबियाचे पुर्नवसन करण्याच्या मागणीसाठी नळदुर्ग येथे शनिवारी महामार्गावर लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोखो आंदोलन केले.

तुळजापूर तालुक्यातील बोरगाव (तु ) येथे दि.१३ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता यातील आरोपीनी संगणमत करुन सुरेश देडे रा. बोरगाव (तुपाचे), ता.तुळजापूर यांना व त्यांची पत्नी, आई यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली, व सुरेश देडे यांच्या घरावरील पत्रे काढुन व भिंती पाडुन अंदाजे 15 हजाराचे नुकसान केले.

याप्रकरणी दि.१४ जुलै रोजी लक्ष्मण व्यंकट पाटील , पिंटु बाबु पाटील , प्रकाश व्यंकटराव पाटील , औदुंबर पाटील , शाम बापु पाटील , वैभव भाऊसाहेब पाटील, काका राजु पाटील व अन्य दोन महिला सर्व रा. बोरगाव, ता.तुळजापूर या नऊ आरोपीविरुध्द सुरेश शिवराम देडे यांच्या फिर्यादीवरुन नळदुर्ग पोलिसात आरोपींविरुध्द अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होवुन आठवडा होत आला. प्रशासनाच्या निषेधार्थ रास्ता रोको करुन आरोपीना तात्काळ अटक करा , पिडित कुंटूबियाचे पुर्नवसन करा या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन सकाळी ११ वाजता नळदुर्ग बसस्थानकासमोर महामार्गावर करण्यात आला.

या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड ,रिपाईचे जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, सुभाष गायकवाड, अजय गायकवाड, नाना गायकवाड, नवनाथ काळे, राजेंद्र काळे, सहदेव देडे, आप्पा कांबळे, ई महीला प्रतिनिधी आकांक्षा गायकवाड, उपस्थित होते.
फोटो – नळदुर्ग येथे बसस्थानक समोर लहुजी शक्तीसेनेचा स्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाईचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड यानी रिपाईचा पाठिंबा देवुन बोलताना.
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!