प्रेमीयुगलांची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या

373

लातूर : राजेंद्र धुळशेट्टे

लातूरच्या जळकोट तालुक्यातील कोळनूर गावचा परब उर्फ गणपती निवृत्ती नरवठे वय 25,वर्ष असलेला तरुण व त्याची प्रेमिका वय 19 वर्षे या दोघांनी नांदेडच्या मुखेड तालुक्यातील कासारवाडी गावच्या शिवारात लक्ष्मण देवकते यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे.

कासारवाडी हे परब नरवठे याचे आजोळ असून त्याच्या मामाच्या शेतातच चिंचेच्या झाडाला गळफास घेतले आहे. परबचे नातेवाईक लक्ष्मण देवकते हे नेहमीप्रमाणे दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतःच्या शेतात गेले असता त्यांना परभ व त्याच्या प्रेमिकेचा एकाच दोरीला गळफास घेऊन चिंचेच्या झाडाला लटकत असल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी ओरडा ओरड करून शेजाऱ्यांना बोलावले असता काही नागरिकांनी तात्काळ मुखेड पोलिसांना फोनकरून घटनेची माहिती सांगताच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होत दोन्ही प्रेत खाली घेऊन पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही प्रेत स्वच्छेदने साठी पाठवण्यात आले असून पुढील तपास मुखेड पोलीस करीत आहेत.

दोघेही जळकोट तालुक्यातील कोळनूर गावचे असून दोघांचे ही नातेवाईक मुखेड पोलीस ठाने येथे हजर झाले आहेत. या घटनेनंतर जळकोट तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रेमी युगलांची आत्महत्या की हत्या असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलाय. मात्र पोलीस तपासा नंतरच या घटनेचे सत्य कळेल. या घटने बाबत जळकोट पोलीस ठाण्यात विचारले असता त्यांच्या कडे मिसिंग असल्याची या दोघांची कोणतीच नोंद नसल्याची माहिती आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!