बारुळ शिवारातील जुगार अड्डयावर छापा; १ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त

186

तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तालुक्यातील बारुळ शिवारात तीन पाणी नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना सहा जण मिळून आले असून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कमेसह १लाख६४हजार६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाही बुधवार दि.२४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील बारुळ शिवारात गणेश दगडू ढाले, जयसूर्या कपिल थोरात, विकास राजेंद्र गायकवाड, शंभू उर्फ महेश ढाले, गोकुळ गुलाब भांगे, सुनील अरुण कसबे सर्व रा.तुळजापूर जि.उस्मानाबाद हे सहा जण स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तीन पाणी नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना रोख रक्कम ६ हजार १४० रुपये, चार दुचाकी किं १लाख२५हजार व चार मोबाईल किं.३२ हजार५०० रुपये असे एकूण १लाख६४हजार६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोहेका आत्माराम जाधव यांच्या फिर्यादीवरून गणेश दगडू ढाले, जयसूर्या कपिल थोरात,विकास राजेंद्र गायकवाड,शंभू उर्फ महेश ढाले,गोकुळ गुलाब भांगे,सुनील अरुण कसबे सर्व रा.तुळजापूरयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो हे का गौतम शिंदे हे करीत आहेत.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!