बौद्ध धम्माचा विचार अत्मसात करण्याची गररज – कांबळे

36
नळदुर्ग दि.२१

आचरण शुद्ध ठेऊन देवाच्या नावाखाली अंधश्रद्धे पोटी केल्या जाणार्‍या कर्म कांडापासून दूर राहून बौद्ध धम्माच्या विचाराचे अनुकरण करण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या लातूर जिल्हा उपाध्यक्ष कविता मधुकर कांबळे यांनी येडोळा ता. तुळजापूर येथे बोलतांना केले .

धम्म भूमी देहुरोड पुणे व सिद्धार्थ कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने येडोळा येथे जागतिक धम्म दिन व वर्षावास प्रारंभ दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम संपन्न झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत मुख्याध्यापक कैलास गवळी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे , पदाधिकारी एस . के गायकवाड , अरुण लोखंडे , आर .एस..गायकवाड , माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर आदि उपस्थित होते .
प्रारंभी गौतम बुद्ध , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली . यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्माचे सूत्रसंचालन मल्हारी लोंढे तर आभार राम लोंढे यांनी मानले.
या प्रसंगी सरपंच पद्माकर पाटील , शाम नागिले , धोंडीराम राठोड , मंडळाचे देवानंद लोंढे , मारुती लोंढे , सुरेश लोंढे , लक्ष्मण लोंढे , प्रवीण कांबळे , अर्जुन लोंढे , अमित लोंढे , जितेंद्र लोंढे , अनिल लोंढे , अजित लोंढे , आदी उपस्थित होते
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!