भजी-वडापाव विकून स्वखर्चाने केली गावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

43

अक्कलकोट : प्रविणकुमार बाबर

सध्या सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून, मुक्या जनावरांसह, नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असतानाचे विदारक चित्र आपल्या समोर जिवंत पाहायला मिळत आहे.

अशातच, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून लक्ष्मण डांगे यांनी भजी वडापाव विकून उदरनिर्वाह करत असताना या नागरिकांची व मुक्याजनावरांची लाहीलाही होत असताना पाहून स्वखर्चाने सांगवी गावातील झोपडपट्टी मधील रहिवाशांना बोअर मारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून गावातील पाणी टंचाई दूर करण्याचा त्यांनी केलेल्या प्रयत्नाचा सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
लक्ष्मण बाबासाहेब डांगे, असे त्या धर्मराजाचे नाव असून, त्या सध्या गावात व्यवसाय करत आहेत. यंदाच्या भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे व अत्यल्प पावसामुळे सांगवीकराना फेब्रुवारी पासून पाणीटंचाई जाणवू लागली, पण सांगवी चे संपूर्ण ग्रामस्थ व ग्रामसेवक ए बी ताड, सरपंच आबूबकर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी नदीतील विहिरीवरून पाईपलाईन करून गावच्या पाण्याच्या टाकीत सोडण्यात आले, व गावातील शिपाई कर्मचारी जावेद मुल्ला यांच्या नियोजन बध्द पाणी पुरवठा करण्याने गावातील जवळपास पाणी प्रश्न मार्गी लागला. पण गावालगत झोपडपट्टी च्या रहिवाशाना पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. ही टंचाई आता डांगे यांच्या माध्यमातून दूर झाली आहे.
बोअर च्या पाण्याची व्यवस्था झाल्याने ग्रामपंचायती कडून ताबडतोब एक हजार लिटर पाण्याची टाकी ची व्यवस्था करून पाणी वितरीत करण्यात आले. तहानलेल्या सांगवीकरांनी पाण्याची सोय केलेल्या लक्ष्मण यांचा या सामाजिक उपक्रमांने सर्वत्र कौतुक होत आहे.

या उद्घाटनप्रसंगी सरपंच आबूबकर शेख, ग्रामसेवक ए बी ताड, पोलीस पाटील प्रविणकुमार बाबर, तंटामुक्त अध्यक्ष प्रवीण घाटगे, सत्तर पाटील, अंकुश घाटगे, जाकीर कागदे, लक्ष्मण मोरे, इरफान शेख, महादेव देवकर, मंजूर पठाण, सादिक मुल्ला, ऑपरेटर जमीर शेख, गजानन जाधव, यासह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!