मंडळ अधिकारी साळुंके यांचा बदली झाल्याने सत्कार तर जगताप यांचे स्वागत

153

काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव सर्कलमध्ये मागील सहा वर्षापासून मंडळ अधिकारी पदाचा कार्यभार व्यवस्थित सांभाळत मंडळ अधिकारी शहाजी साळुंके यांची बदली माकणी येथे झाल्याने व त्यांच्या जागेवर माकणीहून नवीन रुजू झालेले मंडळाधिकारी बी. एस. जगताप यांचे स्वागत सुरतगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने बुधवार दि. (12) विविध मान्यवरांच्या हस्ते शाल , श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार व स्वागत करण्यात आले.

यावेळी तलाठी आबासाहेब सुरवसे, माजी सरपंच भागवतराव गुंड, आण्‍णासाहेब गुंड, धम॔राज गुंड, विठठल गुंड, गजेंद्र बोचरे, तानाजी पाटील, आबा गुंड, भुजंग गुंड, सलीम शेख,तुकाराम गुंड आदी मान्यवर उपस्‍थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!