मनोमिलनानंतरही आघाडीत शह काटशहचे राजकारण

350

नळदुर्ग, दि. 25 : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व काग्रेसमध्ये आघाडी झाल्याने उस्मानाबाद मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकत्यामध्ये सध्या मनोमिलनाचे कार्यक्रम होत आहेत. त्यातुनच शह काटशहचे राजकारण होताना दिसत आहे.

तुळजापूर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची मनोमिलन सभा शनिवारी संपन्न झाली. माञ राष्ट्रवादीचे तुळजापूर तालुक्यातील नेते आशोक जगदाळे हे या सभेत दिसले नाहीत. याबद्दल तुळजापूरचे विद्दमान आमदारांनी राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकरवी जगदाळे यांना या मनोमिलन सभेस येण्यापासून रोखा असा संदेश दिल्याची चर्चा नळदुर्ग शहरात दिवसभर सुरू होती. यामुळे जगदाळे यांची तुळजापूर तालुक्यात वाढलेली ताकद, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याशी आसलेले घनिष्ठ संबध व विधानसभेसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम आसल्यामुळे विद्दमान आमदारांनी जगदाळे यांचा चांगलाच धसका घेतल्याची चर्चा रंगली होती.
तुळजापूर येथे राष्ट्रवादीचे माजी खासदार पद्मसिंह पाटील, लोकसभा उमेदवार तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील यांच्यासह जिल्हाअध्यक्ष, तालुक्यातील आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते, जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मनोमिलन मेळवा शनिवारी संपन्न झाला. माञ नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार राहिलेल्या जगदाळे यांना मनोमिलन मेळाव्यास येण्यापासून रोखण्यात आले. काही महिन्यापुर्वी बीड, उस्मानाबाद व लातूर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीत जगदाळे यांनी ऐन संकटा वेळी आघाडीची आब्रू वाचवली होती. या निवडणूकीत राष्ट्रवादीने कराड यांना उमेदवारी दिली माञ कराड यांनी शेवटच्या क्षणी माघार घेत भाजपाशी संधान साधून आघाडीला संकटात ढकलले होते. आशा वेळी राष्ट्रवादीचे आशोक जगदाळे यांनी नवखे असुनही प्रयत्नाची पराकाष्ठा करत केंद्र व राज्यात सत्तेत आसलेल्या भाजपाच्या आनेक नेत्यांना या निवडणूकीच्या प्रचारात येण्यास भाग पाडले. यावरुन भाजपानेही जगदाळे यांचा धसका घेतला होता हे दिसून येते माञ जगदाळे यांना आघाडीतील काही मतदारांनी मदत व मतदान न केल्यामुळे विजयापासून वंचित रहावे लागले. यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यात माञ जगदाळे यांनी पक्षाला संकटातून वाचवल्यामुळे जगदाळे यांची एक चांगली प्रतिमा तयार झाली आहे. विजयाने हुलकावनी दिल्यानंतर जगदाळे हे नव्या जोमाने कामाला लागले असून त्यांनी संपूर्ण तुळजापूर तालूका व तुळजापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. या मतदारसंघात विविध सामाजिक काम, विवाह सोहळे, शेतकऱ्यांना मदत, दुष्काळी भागात मदतकार्य या कामामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परिणामी या सर्व कामामुळेच तुळजापूर विधानसभा निवडणूकीच्या फडात जगदाळे हे जड जाणार आशी भीती विद्दमान आमदारांना सतावत आहे. या भीतीमुळे जगदाळे यांना मनोमिलन मेळव्यास येण्यापासून रोखण्यात आल्याचे दिसून येत आहे.

याबाबत जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही यास दुजोरा दिला व जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा उमेदवार आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विनंती केल्यामुळेच या तुळजापूर येथील मेळव्यापासून दुर राहिल्याचे सांगितले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!