महायुतीच्या उमेदवाराकडून धुरगुडेना वाढदिवसाच्या शुभेच्छा, राणा पाटलांनी माञ फिरवली पाठ

3,077

तुळजापूर, दि. ०८ : उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांचा वाढदिवस नुकताच मंगरूळ येथील सन ॲन्ड ओशन कंपनीत साजरा झाला. सर्वसमावेशक वृत्ती, विरोधकावर टीकेपेक्षा स्वकर्तुत्वावर विश्वास ठेऊन सर्वपक्षियांशी मैञी जपत आसल्यामुळे धुरगुडे यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, अँड, अनिल काळे, रोहन देशमुख, विजय शिंगाडे आदीनी धुरगुडे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे उठता बसता दादा दादा म्हणणा-या धुरगुडे ( महेंद्र धुरगुडे हे कट्टर राणा समर्थक आहेत) यांना शुभेच्छा देण्यासाठी राणादादांना वेळच मिळाला नाही यामुळे सामान्यांचा मसिहा ठरलेल्या धुरगुडे यांच्या समर्थकात माञ वेगळीच कुजबुज व नाराजी पसरल्याची चर्चा आहे.
आधीच तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीत दुफळी आसल्याच्या चर्चा सर्वञ सुरू आसतानाच राणा पाटील यांनी धुरगुडे सारख्या लोकमानसात चांगली प्रतिमा आसलेल्या नेत्याच्या वाढदिवस दिनी शुभेच्छा देण्यास न जाणे ही बाब सध्या सुरू आसलेल्या चर्चेस बळकटी देणारी आहे.

यापुर्वीची विशेष घटना म्हणजे ३० मार्चला राणा पाटील यांनी सुनिल चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या तुळजाभवानी कारखाना, नळदुर्ग येथील कार्यक्रमास सहकुटूंब हजेरी लावत शुभेच्छा दिल्या होत्या. माञ दुसरीकडे तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आशोक जगदाळे व महेंद्र धुरगुडे यांना जाणूनबुजून डावलले जात आहे. जगदाळे यांना तर मनोमिलन मेळाव्यास येण्यास मज्जाव करून प्रचारापासूनही दुर ठेवले आहे. आणि आता तालुक्यातील तीन जि.प. सर्कलमध्ये चांगली प्रतिमा व जनसामान्यांशी थेट संपर्क आसलेल्या धुरगुडे यांच्या वाढदिवसाला न येणे राणा पाटील यांना अडचणीचे ठरणार का? याऊलट महायुतीचे उमेदवार व नेते प्रचारातून वेळ काढून धुरगुडे यांना शुभेच्छा देऊन धुरगुडे समर्थकांना आपलेसे करण्यात यशस्वी ठरले आहेत.

मागील वर्षी महेंद्र धुरगुडे यांच्या वाढदिवसाला जि.प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी हजेरी लावली होती. यावर्षी लोकसभा निवडणूक आसूनही पाटील कुटूंबियांनी आपल्या समर्थक नेत्याच्या वाढदिवासाला न जाणे नव्या चर्चेला तोंड फोडणारे आहे.

यामागे नक्कीच तुळजापूरवाल्या नेत्याची धास्ती व “हात” असेल अशी चर्चा सामान्य नागरिकात सुरू आहे. महत्वाचे म्हणजे महेंद्र धुरगुडे हे मागील पंधरा दिवसापसून राणा पाटील यांच्या प्रचारसाठी फिरत आहेत.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!